पुण्यातही दोन विशाल फटे; शेअर मार्केटच्यानावाखाली कोट्यांवधींचा गंडा

लोणी काळभोरमध्ये फरवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल
Pune Share Market Scam News
Pune Share Market Scam NewsSarkarnama
Published on
Updated on

लोणी काळभोर : शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवा, तुम्हाला चांगल्या प्रकारे परतावा मिळवून देतो असे सांगून १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यामुळे पुण्यातही विशाल फटे (vishal phate)असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, विशाल फेटेने बार्शीमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करुन देतो म्हणून गुंतवणुक दारांना कोट्यांवधी रुपयांचा गंडा घातला आहे. त्या प्रकरणाची संध्या राज्यात जोरदार चर्चा आहे.

याप्रकरणी ममता सिंह मलिक (वय ३८, रा. अमरवस्ती, कोरेगाव मुळ, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस स्टेशमध्ये दिलेल्या तक्रारीवरून रवी कानकाटे उर्फ रवींद्र मुरलीधर भोसले उर्फ जगदीश मुरलीधर भोसले आणि स्वप्नील कानकाटे (रा. दोघेही इनामदार वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Share Market Scam in Pune)

Pune Share Market Scam News
मावळच्या लेकींसाठी बाळा भेगडेंचे परराष्ट्र मंत्र्यांकडे साकडे

लोणी काळभोर पोलिस (Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिक यांचे कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती येथे सेंद्रिय उत्पादन व विक्रीच्या व्यवसायाचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी रवी कानकाटे व स्वप्नील कानकाटे या दोघांनी आयुर्वेदिक न्युट्रीशियनबाबत ममता मलिक यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडून काही उत्पादने खरेदी केले होते. त्यानंतर कार्यालयात त्यांचे येणे-जाणे सुरु होते. त्यावेळी त्या दोघांनी मलिक यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबतचा सल्ला दिला.

स्वप्नील कानकाटे हा एचडीएफसी बँकेमध्ये नोकरी असल्याचे सांगून रवी कानकाटे यास तुम्ही पैसे द्या, त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो असे सांगितले. अशाप्रकारे दोघांनी विश्वास संपादन करून ममता मलिक यांनी सात महिन्यात रवी कानकाटे यांच्या बँक खात्यात नातेवाईक, मुलगा इतर व्यक्तीकडून घेऊन एक कोटी रुपये दिले होते.

Pune Share Market Scam News
रक्षकच झाला भक्षक; पोलिसानेच केला प्राध्यापिकेवर लैंगिक अत्याचार

दरम्यान, रवी कानकाटे यांनी मलिक यांना गुंतवणुकीवरील परतावा म्हणून दोन कोटी पन्नास लाख रूपयांचा एका बँकेचा रवी भोसले नावाच्या व्यक्तीचा चेक दिला. चेक बँकेत भरला तेव्हा ते खाते बंद असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. यावरून रवी भोसले नावाचा बंद असलेल्या बँकेच्या खात्याचा धनादेश देवून त्यांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिसात दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com