रक्षकच झाला भक्षक; पोलिसानेच केला प्राध्यापिकेवर लैंगिक अत्याचार

बलात्काराचे दोन गंभीर गुन्हे काल एका दिवसात नोंद झाल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिस हादरले.
Crime
Crime Sarkarnama

पिंपरी : बलात्काराचे दोन गंभीर गुन्हे काल एका दिवसात नोंद झाल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिस हादरले. कारण त्यातील एका गुन्ह्यांत एक पोलिसच (Police), तर दुसऱ्यात तीन वकील आरोपी आहेत. म्हणजे रक्षकच भक्षक झाले आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस आकाश प्रकाश पांढरे याने नर्सिगचे कोर्सेस घेणाऱ्या प्राध्यापिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहताच तिचा गर्भपातही त्याने केला. लग्न न केल्याने फसवल्याचे समजताच या पीडीत महिलेने आता भोसरी पोलिसांत फिर्याद दिली. तर, दुसऱ्या घटनेत वाघोली, पुणे येथील एक महिला वकीलच लैंगिक अत्याचाराची शिकार झाली आहे. काम देण्याचे आमिष दाखवून कल्याण येथील वकील अजय अप्पाराव साताळकर याने या महिला वकिलावर वारंवार लैंगिक शोषण केले.

साताळकर वकिलाचे धाडस एवढे की त्याने महिला वकिलाचे विवस्त्र अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले. त्याआधारे तो तिला ब्लॅकमेल करीत राहिला. त्यात त्याची वकिल पत्नी आणि पत्नीची वकिल मैत्रिण यांनीही साथ दिल्याने त्यांनाही या गु्न्ह्यात आरोपी केल्याचे भोसरी पिंपरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. साताळकरची पत्नी व तिची मैत्रिण या पीडीत वकिल तरुणीला धमकावून शिवीगाळ करीत होत्या. साताळकरच्या पत्नीने, तर फिर्यादीचे विवस्त्र फोटो आणि व्हिडिओ तिच्या बहिणालाही पाठवले होते.

Crime
राऊतांची अवस्था भरकटलेल्या जहाजासारखी ; मोहोळांचे प्रत्युत्तर, 'हा' धंदा कुणाच्या आशीर्वादाने

साताळकर वकिलाने पीडीतेशी मैत्री करून नंतर प्रेमाची मागणी केली. त्याला तिने नकार दिला. त्यानंतर त्याने एसआरएचे काम देतो असे सांगून तिला पिंपरीतील हॉटेलात बोलावले. तिथे त्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. नंतर तिच्यावर बलात्कार केला. त्याचे फोटो काढले. त्याआधारे तो वारंवार तिला ब्लॅकमेल करीत होता. पण, जेव्हा तिच्या बहिणाला तिचे विवस्त्र फोटो पाठवण्यात आले, तेव्हा तिने २०१८ पासून सुरु असलेल्या या प्रकरणी अखेर पिंपरी पोलिसांत धाव घेतली. मात्र, अद्याप नराधम आरोपींना अटक झालेली नाही.

Crime
Phone tapping हे तर महाराष्ट्रातील भाजपचे गुजरात मॉडेल..

असाच बलात्काराचा दुसरा गुन्हा काल भोसरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. हा प्रकार ऑक्टोबर २०२० पासून आतापर्यंत घडलेला आहे. त्यात बळी पडलेली पिडीता ही नर्सिंगचे कोर्सेस घेते. नवऱ्यापासून ती वेगळी राहते. त्यामुळे आरोपी पोलिस पांढरेने तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. एवढेच नाही, तर तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केला. पीडीता गर्भवती राहताच तिचा गर्भपात आरोपीने केला. त्यामुळे तिने पोलिसांत काल तक्रार दिली. दरम्यान, आरोपी आजारपणाच्या रजेवर असल्याने त्याला अटक झालेली नाही. मात्र, लवकरच त्याच्या मुसक्या आवळू, असे भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com