दुर्दैवी : भाटघर धरणात बुडून पाच महिलांचा मृत्यू; मुलीला वाचविण्यात यश

दुसऱ्या एका घटनेत खेड तालुक्यातील चास कमान धरणात चार मुले बुडाली आहेत.
Five women Died in Bhatghar dam
Five women Died in Bhatghar damSarkarnama
Published on
Updated on

भोर : भोर (Bhor) तालुक्यातील भाटघर धरणात बुडून पाच विवाहित महिलांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना आज (ता. १९ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. या पाचही जणी पुण्यातील रहिवासी असून त्या पाहुण्यांकडे आल्या होत्या. दरम्यान, यापूर्वी याच धरणात बोट उलटून १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. (Five women Died in Bhatghar dam)

खुशबू लंकेश रजपूत (वय १९, रा बावधन), मनीषा लखन रजपूत (वय २०), चांदनी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघीही रा संतोषनगर, हडपसर पुणे) मोनिका रोहित चव्हाण (वय २३, रा नऱ्हे, पुणे) अशी मृत महिलांची नावे आहेत. यातील खूशबू आणि चांदनी यांचे मृतदेह अजून मिळालेली नाहीत, उर्वरीत तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

Five women Died in Bhatghar dam
राष्ट्रवादीचा बार फुसका; संग्राम थोपटेंसह १० जणांची ‘राजगड’वर बिनविरोध निवड!

दरम्यान धरणात बुडलेल्या सर्व महिला या कंजारभाट समाजाच्या आहेत. धरणात एकूण सहा जण बुडाले होते, त्यातील एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. भाटघर धरणालगतच्या नऱ्हे गावच्या हद्दीत गुरुवारी (ता. १९) सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे. नरे गावातील कातकरी समाजाच्या तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहेत.

Five women Died in Bhatghar dam
लोकसभेला व्होट आणि नोट मिळविणाऱ्या सदाभाऊंनी अनुभवला सोलापुरी हिसका!

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले आहेत. सह्याद्री सर्च अण्ड रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले आहे. यापूर्वी बोट उलटून १४ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. ते सर्वजण लग्नाचा कार्यक्रम उरकून धरणाच्या पलीकडे जात होते, त्यावेळी धरणाच्या पाण्यात बोट उलटली होती. त्यात १४ जणांना जिवाला मुकावे लागले होते. त्यानंतरची ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.

चासकमान धरणात चार मुले बुडाली; शोध सुरू

दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात असलेल्या चासकमान धरणात पोहायला गेलेली चार मुले पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या सह्याद्री स्कूलची ही मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. चारपैकी दोन मुलांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना चाकण येथील युनिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अद्याप दोन मुलांचा शोध सुरु आहे.

Five women Died in Bhatghar dam
आमदार अशोक पवार शिरूर-हवेलीला लवकरच देणार ‘गूड न्यूज’!

दरम्यान, चारही मुले उच्च सोसायटी वर्गातील परराज्यातील असल्याची माहिती आहे. सह्याद्री स्कुलमधून बाहेर पडता येत नसतानाही मुले पोहायला कशी गेली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यामध्ये स्कूल प्रशासनाच्या गलथान कारभार आहे का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com