पुण्यातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या प्रथमच एक हजाराखाली

पुण्यात आतापर्यंत नऊ हजार ६७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
corona
coronaSarkarnama
Published on
Updated on

पुणे : कोरोना साथीच्या गेल्या दीड वर्षाच्या काळात पहिल्यांदाच पुणे शहरातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या एक हजाराखाली आली आहे. आज दिवसभरात ११२ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर ११९ रूग्ण बरे होऊन घरी परतले.

पुण्यात कोरोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू झाला यातील चारजण पुण्याबाहेरील आहेत.१५८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या पाच लाख ३ हजार ३५७ इतकी झाली आहे. पुण्यात आतापर्यंत नऊ हजार ६७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर चार लाख ९३ हजार २९६ रूग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

corona
रामदास आठवले म्हणाले; पुण्याच्या महापौरपदाचा फडणविसांनी शब्द दिलाय

शहरात गेल्या दीड वर्षांमधील कोरोनाच्या सर्वांत कमी रुग्णसंख्येची नोंद सोमवारी महापालिकेत झाली. दिवसभरात ७० रुग्णांना कोरोनाचे निदान झाले. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वांत कमी रुग्णसंख्या ठरली.दरम्यान,शहरातील कोरोना संसर्गाचा दर सलग तीन आठवड्यांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी नोंदला जात आहे.

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्यावर्षी ९ मार्चला पुण्यात आढळला. त्यानंतर एकापाठोपाठ एक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. अवघ्या एका महिन्यात कोरोनाबाधीतांचा आकडा २०० पर्यंत वाढला होता. देशात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण पुण्यात होते. शहरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १६ सप्टेंबरला एका दिवशी सर्वाधिक म्हणजे दोन हजार १२० रुग्णांना संसर्ग झाल्याची नोंद महापालिकेत झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या सातत्याने कमी होत गेली.

corona
‘लॉकडाऊन’च्या नावाखाली राज्य सरकारने अडवल्या तब्बल ४२९ नियुक्त्या

यंदा २५ जानेवारीला कोरोनाचे ९८ रुग्ण होते. ही पहिल्या लाटेतील एका दिवसातील सर्वांत कमी रुग्णसंख्या ठरली. फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढू लागला. ही शहरातील दुसऱ्या लाटेची सुरवात असल्याचे आता दिसते. शहरात यंदा ९ मार्चपर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या एक हजार ८६ पर्यंत वाढली होती. अवघ्या महिन्यात म्हणजे ८ एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या सुमारे साडेसहा पटीने वाढली. त्यामुळे ८ एप्रिल या एकाच दिवशी सात हजार १० रुग्ण नव्याने आढळले होते. ही शहरातील दुसऱ्या लाटेतील एका दिवसातील उच्चांकी रुग्णसंख्या ठरली.

पुण्यात एकेका दिवशी हजारो रुग्णांना संसर्ग होत असल्याचे निदान प्रयोगशाळांमधून होत होते. त्यात शहरात १८ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या महिन्याभरात चार हजार १९२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचा उद्रेक कमी होत असल्याचे स्पष्ट होते.

कोरोना नियंत्रणाची कारणे

१. कोरोनाची कोणतेही लक्षणे दिसल्यास तातडीने प्रयोगशाळा तपासणी करण्याकडे कल.

२. लसीकरणाचा वाढलेला प्रतिसाद.

३. लसीकरण आणि बहुतांश पुणेकरांना झालेला कोरोना यामुळे शहरात या विषाणूंना प्रतिकार करण्याची सामुहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार झाली.

४. विषाणूंमध्ये नव्याने बदल झाला नसल्याचे प्रयोगशाळेतील संशोधनातून स्पष्ट झाले आहे. विषाणू स्वतःमध्ये सातत्याने बदल करत असतात. हा त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे. विषाणूंमध्ये असा बदल होत असताना त्याच्या संसर्गाची क्षमता कमी होते. पुण्यात सध्या हा अनुभव येत असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

दृष्टीक्षेपात पुण्यातील कोरोना उद्रेक

पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्या : दोन हजार १२०

पहिल्या लाटेतील सर्वांत कमी रुग्णसंख्या : ९८

दुसऱ्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्या : सात हजार १०

दुसऱ्या लाटेतील आतापर्यंतची निच्चांकी रुग्णसंख्या : ७०

एका दिवशी असलेले सर्वाधिक सक्रिय रुग्ण : ५६ हजार ६३६

प्रयोगशाळा चाचण्यांत पुणे आघाडीवर

शहरातील कोरोना संसर्गाचा दर सलग तीन आठवड्यांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी नोंदला जात आहे. दर दशलक्ष लोकसंख्येमागे कोरोना निदानाच्या चाचण्यांमध्ये राज्यात पुणे आघाडीवर आहे.

...तरीही काळजी आवश्‍यक

पुण्यात सध्या कोरोनाच्या सर्वांत कमी रुग्णांची नोंद होत आहे. ही आपल्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे. पण, अद्यापही संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण आहे. या पार्श्वभूमिवर पुणेकरांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com