राष्ट्रवादीच्या नेत्याचं गाव फोडून शेजारच्या झेडपी गटाला जोडले!

भौगोलिक दृष्टीकोनातून विचार न करता राजकीय दबावातून भोरमधील जिल्हा परिषद गटाची रचना : विक्रम खुटवड
Vikram Khutwad
Vikram KhutwadSarkarnama
Published on
Updated on

नसरापूर (जि. पुणे) : भोर (Bhor) तालुक्यात नव्याने जिल्हा परिषदेचे (ZP) चार गट तयार करताना भौगोलिक दृष्टीकोनातून विचार न करता राजकीय सुडबुध्दीने, राजकीय दबावापोटी हातवे परिसरातील चार गावे आणि नसरापूर परिसरातील चार गावे यांची आदलाबदल करण्यात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवा नेते, जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड यांनी केला. याबाबत लवकरच हरकत घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Formation of Zilla Parishad group in Bhor due to political pressure : Vikram Khutwad)

भोर तालुक्यात नवीन लोकसंख्येनुसार जिल्हा परिषदेच्या चार गटांची रचना करण्यात आली आहे. वेळू-नसरापूर गटाच्या नसरापूर गणातील करंदी (खे. बा.), कामथडी, खडकी, उंबरे ही चार गावे वगळून ती जुन्या भोंगवली संगमनेर गटातील संगमनेर गणाचे नाव कामथडी करून त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. जुन्या संगमनेर गणातील गुंजवणी नदी पलीकडील तांभाड, हातवे खुर्द, हातवे बुद्रुक व मोहरी बुद्रुक ही चार गावे नसरापूर गणाला जोडली आहेत. या चार गावांच्या आदलाबदलीबाबत तालुक्यात राजकीय चर्चा रंगली आहे.

Vikram Khutwad
राज्यसभा निवडणूक : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधीच फडणवीसांचा अपक्ष आमदारांना फोन!

या नवीन बदलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड यांचे स्वतःचे गाव हातवे खुर्द आणि त्यांचे प्राबल्य असलेली शेजारील तांभाड, हातवे बुद्रुक, मोहरी बुद्रुक ही गावे ते नेहमी लढत असलेल्या संगमनेर-भोंगवली जिल्हा परिषद गटातून वगळून शेजारील नसरापूर-वेळू गटात समाविष्ट करण्यात आली आहेत. नसरापूर-वेळू गटातील कामथडी, करंदी, उंबरे व खडकी ही गावे नव्याने संगमनेर-भोंगवली गटात समाविष्ट केली असून संगमनेर गणाचे नाव बदलत कामथडी करण्यात आले आहे.

Vikram Khutwad
मोठी घडामोड : धनंजय महाडिकांनी घेतली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट!

या बदलाबाबत विक्रम खुटवड म्हणाले की नसरापूर गावाला लागून असलेली गावे तोडून भौगोलिकदृष्टया लांब व नदीपलीकडची गावे नसरापूर गटाला जोडली आहेत. हे म्हणजे भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता जाणिवपूर्वक राजकीय सुडबुध्दीने केलेले काम आहे. शासकीय निकषानुसार रचना न करता भौगौलिक सलगता न पाहता राजकीय दबावाला बळी पडून केलेली ही रचना आहे. या बाबत आम्ही हरकत घेऊन न्याय मागणार आहोत. ज्यांना समोर लढून विजय मिळणार नाही, याची खात्री असल्याने त्यांच्याकडून अशा कुरघोड्या केल्या जात आहेत. मात्र, जनता सुज्ञ असून अशा कुरघोड्या यशस्वी होऊ देणार नाही. या निवडणुकीत त्यांना त्याचे चोख उत्तर मिळेल, असा इशाराही खुटवड यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com