मोठी घडामोड : धनंजय महाडिकांनी घेतली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट!

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या उर्वरित आमदारांनाही आपण लवकरच भेटणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.
P. N. Patil-Dhananjay Mahadik-Vinay   Kore-Rajesh Patil
P. N. Patil-Dhananjay Mahadik-Vinay Kore-Rajesh PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya sabha Election) निमित्ताने राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सहाव्या जागेसाठी भाजपने कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि शिवसेनेचे (shivsena) कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्यामध्ये मोठी चुरस आहे. एक एक मत महत्वाचे असल्याने भाजप आणि शिवसेनेकडून आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या गाठीभेटीस सुरुवात केली आहे. त्यांनी रविवारी काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील (P.N. Patil), राष्ट्रवादीचे चंदगडचे आमदार राजेश पाटील (Rajesh Patil), जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे (Vinay kore) यांची भेट घेतली आहे. (Dhananjay Mahadik meets Congress-NCP MLAs in Kolhapur)

दरम्यान, धनंजय महाडिक आणि आपली भेट झाली नसल्याचे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या उर्वरित आमदारांनाही आपण लवकरच भेटणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

P. N. Patil-Dhananjay Mahadik-Vinay   Kore-Rajesh Patil
शिवसैनिकांनी हिसका दाखवताच सोलापूर बस स्थानकात शिवराज्याभिषेकदिन साजरा झाला!

राज्यसभेसाठी राज्यातून सहा जणांना निवडून द्यायचे आहे. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी एक, तर शिवसेना दोन आणि भाजपकडून तिघांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तब्बल २४ वर्षांनंंतर राज्यात राज्यसभेची निवडणूक लागली आहे. सहाव्या जागेवर भाजप आणि शिवसेनेकडून दावा करून उमेदवार देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी कोल्हापूचे उमेदवार दिले आहेत, त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

P. N. Patil-Dhananjay Mahadik-Vinay   Kore-Rajesh Patil
आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षाला बेदम मारहाण

महाविकास आघाडीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, भाजपने तो प्रस्ताव नाकारून निवडणूक लढविण्यावर आपण ठाम असल्याचे जाहीर केले होते. मतदानाची १० जून ही तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतशा हालचाली वाढल्या आहेत. महाडिक हे स्वतः आमदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह संपूर्ण टीम कामाला लागली आहे.

P. N. Patil-Dhananjay Mahadik-Vinay   Kore-Rajesh Patil
राज्यसभा निवडणूक : डहाणूचे आमदार निकोले यांचा महाआघाडीला पाठिंबा

धनंजय महाडिक यांनी परवा वसई विरारचे बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. बहुजन विकास आघाडीकडे तब्बल तीन आमदार आहेत, त्यामुळे भाजपसह शिवसेनेचा डोळा त्यांच्या मतावर आहे. ठाकूर यांच्या भेटीनंतर महाडिक यांनी आपला मोर्चा कोल्हापूरकडे वळविल असून त्यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे.

P. N. Patil-Dhananjay Mahadik-Vinay   Kore-Rajesh Patil
भाजपच्या महाडिकानंतर शिवसेना नेते हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला!

त्यादृष्टीकोनातून महाडिक यांनी रविवारी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीगाठीसंदर्भात महाडिक म्हणाले की, मी राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या मतदारांना भेटून विनंती करणे हे त्याचे कर्तव्य असते, त्याच पद्धतीने मी सर्वच आमदारांना भेटत आहे. अगदी मतदान करेपर्यंत सर्वांनी विनंती करणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांचा समावेश आहे. लवकरच आपण आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेणार आहे, तसेच इतर आमदारांची वेळ घेऊन त्यांना मतदानाची विनंती करणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com