Laxmi Dudhane Swapnil Dudhane : लक्ष्मीवहिनी अन् स्वप्नीलभाऊंचे पक्के ठरले, पवारसाहेबांच्याच राष्ट्रवादीत राहिले

Swapnil Dudhane laxmi Dudhane in Sharad Pawar's NCP : लक्ष्मी दुधाणेंं आणि स्वप्नील भाऊंची उघड-उघड शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला साथ
Swapnil Dudhane , Laxmi Dudhane
Swapnil Dudhane , Laxmi DudhaneSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन गट पडले. थोरल्या पवारसाहेबांकडे १५-१७ आमदार उरले आणि धाकटे पवार म्हणजे अजितदादांकडे ३०-३२ आमदार वळले. या सगळ्या प्रकारात जुन्या, जाणत्यांनी पवारसाहेबांकडे राहाणे पसंत केले. तेवढीच मंडळी अजितदादांच्या तंबूत गेली. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अर्थात, पुण्यातील काही नगरसेवकांनी अजितदादांच्या बंडाला साथ दिली आहे. बरेचजण 'साहेबांना कसे सोडायचे ? या गोंधळात अडकले आहेत.

Swapnil Dudhane , Laxmi Dudhane
Maharashtra Politic's : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या वाटपाचं सूत्रं ठरलं; अशी होणार विभागणी

पक्षातील बंडळीच्या वादळात त्यांना अडकायचे नाही. बंडाचे हे वादळ शमण्याची आशा त्यांना आहे. म्हणूनच काही केल्या कोणालाही आपला अंदाज लागू देत नाहीत. त्यातून काहीजण बाहेरगावी गेले आहेत. त्यातील १०-१५ जण आजारी असल्याचे दाखवून देत आहेत. (बहुतेक राजकीय आजार असावा) पत्ते उघड करायला तयार नाहीत. मात्र, कर्वेनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाणेंनी उघड-उघड साहेबांच्या राष्ट्रवादीवर 'निष्ठा' दाखवली आहे.

Swapnil Dudhane , Laxmi Dudhane
Ahmednagar Politics : रोहित पवारांनी उचलून धरलेल्या कर्जत 'MIDC'मध्ये नीरव मोदीची एन्ट्री; शिंदेंच्या दाव्याने खळबळ !

साहेबांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या उपस्थितीत पदाधिकारी- कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन, लक्ष्मीवहिनींनी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वातच काम करणार असल्याचे जाहीर केले आहे.परंतू, या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या इतर नगरसेवकांनी पाठ फिरवली, हेही यावेळी दिसून आले. सुप्रिया सुळे, लक्ष्मीवहिनी आणि त्यांच्या कुटुंबियांची जवळीक आहेच. त्यातूनच राष्ट्रवादीच्या कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणेंनीही जुन्या राष्ट्रवादीचे “घड्याळ' कायम ठेवले आहे. कर्वेनगर आणि वारजेतील राष्ट्रवादीच्या इतर नगरसेवकांनी भूमिका उघड केल्या नसल्या, तरी तरी लक्ष्मीवहिनींच्या पवित्र्यामुळे कर्वेनगरमध्ये साहेबांची राष्ट्रवादी नव्या दमाने लढण्याची शक्यता आहे.

Swapnil Dudhane , Laxmi Dudhane
Uddhav Thackeray Birthday : 'वाईल्ड लाईफ' फोटोग्राफर, पत्रकार ते शिवसेना पक्षप्रमुख ; पाहा उद्धव ठाकरेंचे काही खास फोटो !

कर्वेनगर, वारजेमध्ये फारपूर्वी काँग्रेस आणि थोडी भाजपची ताकद होती. गेल्या २० ते २५ वर्षांत उज्ज्वल केसकर त्यांच्या साथीला शिवराम मेंगडे, त्यापाठोपाठ विठ्ठल चौधरी यांनी भाजपला चांगले दिवस आणले. राष्ट्रवादीच्या जन्मापासून म्हणजे १९९९ नंतर या भागांतून आधी एक नगरसेवक होता. त्यानंतर त्यांची संख्या वाढली गेली. परंतू, भाजप, मनसेच्या वाढलेल्या ताकदीने येथील नगरसेवकांचा आकडा कधीच चार-पाचच्या पुढे गेला नाही. त्यात माजी उपहामौर दिलीप बराटे, सचिन दोडके, बाबा धुमाळ, दिपाली धुमाळ आणि मागील टर्मपासून सायली वांजले निवडून आल्या आहेत.

Swapnil Dudhane , Laxmi Dudhane
Assembly Session : थोरात म्हणाले, ‘त्यांच्या मुसक्या बांधा’; फडणवीसांनी मुसक्या बांधण्याचे जाहीरच केले...

भाजपचे प्राबल्य असलेल्या कर्वेनगरमधून (शाहू कॉलनी) लक्ष्मी दुधाणे दोनदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यामुळे राष्ट्रवादीत लक्ष्मीवहिनी आणि त्यांचा मुलगा स्वप्नील दुधाणेंना महत्त्व आहे. मात्र, राष्ट्रवादीताल फुटीनंतर स्वप्नील दुधाणे हे अजितदादांकडे ( Ajit Pawar ) जाऊन बदल्यात राजकारणात उतरण्याची शक्यता होती. लक्ष्मीवहिनीही मूळ राष्ट्रवादी सोडतील का ? याकडे लक्ष होते. मात्र, हे दोघेही साहेबांच्या राष्ट्रवादीत राहणार असल्याचे जाहीर केले. ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर ( Deepak Mankar ) आणि त्यांचा मुलगा कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर हे अजितदादांकडे गेले. त्यानंतर हर्षर्वधन यांच्याकडील साहेबांच्या गटाची जबाबदारी स्वप्नील यांनी स्वतःकडे घेतली. कर्वेनगरमध्ये जुनी राष्ट्रवादी राहणार असल्याचे दाखवून दिले. पुढच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुधाणेंनी मेळावा घेऊन साहेबांचा पक्ष वाढविण्याचा शब्द दिला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत स्वप्निल हे भाजपच्या नगरसेवक राजेश बराटे किंवा सुशील मेंगडे यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com