Jitendra Awhad On Shasan Aplya Dari: 'शासन आपल्या दारी अन् महाराष्ट्र झाला भिकारी'; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर निशाणा

Shinde-Fadnavis-Pawar government : 'शासन आपल्या दारी' या उपक्रमावर सरकारने लोकांच्या पैशांची उधळपट्टी लावल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Thane News: शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्यावतीने राज्यात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. मात्र, 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमावर करण्यात येत असलेल्या अवाढव्य खर्चावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

एकीकडे राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना 'शासन आपल्या दारी' या उपक्रमावर सरकारने लोकांच्या पैशांची उधळपट्टी लावली असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला घेरलं असून शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी, असा खोचक टोला लगावला आहे.

Jitendra Awhad
Shasan Aplya Dari: 'शासन आपल्या दारी'वर आतापर्यंत ३३ कोटींचा खर्च; उपक्रम शासनाचा 'क्रेडिट' घेताहेत स्थानिक आमदार-खासदार

"शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी, अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांकडून निर्माण करण्यात आली आहे", असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी केला. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्या काळात राज्यात अनेक उद्योग राज्यात येत होते. ही माहिती अधिकृतपणे उघडकीस आली. मात्र, आता राज्यात धार्मिक, जातीय द्वेष वाढीस लागत असल्याने उद्योजक महाराष्ट्रात येण्यास तयार नाहीत, असा आरोपही आव्हाडांनी केला.

राज्य सरकारने 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम शासकीय योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी सुरु केला असल्याचे सांगण्यात येते. पण आता या उपक्रमावर होणाऱ्या खर्चांवरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. आतापर्यंत १५ ठिकाणी हा कार्यक्रम झाला असून तब्बल ३३ कोटी ३३ लाखांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या उपक्रमावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर हल्लाबोल करत शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी, असा घणाघात केला आहे. त्यामुळे शासन आपल्या दारी उपक्रमावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

Edited by - Ganesh Thombare

Jitendra Awhad
Chandrapur Politics: प्रतिभा धानोरकर लोकसभेच्या मैदानात एन्ट्री करणार ? मोर्चेबांधणी सुरू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com