Pune News: आयुक्तांचा 'तो' निर्णय वादात ? माजी उपमहापौरांचा थेट कोर्टात जाण्याचा इशारा

Aba Bagul : 'स्वारगेट'ची जागा 'महामेट्रो'ला देण्याच्या निर्णयाला माजी उपमहापौर आबा बागूल यांनी विरोध दर्शविला.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सार्वजनिक हितासाठी पुणे महापालिकेने 'स्वारगेट'ची जागा महामेट्रोला दिली आहे. त्यामुळे या जागेवर उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या व्यापारी संकुलातून 50 टक्के हिस्सा हा पुणे महापालिकेला मिळणे बंधनकारक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत ही जागा मेट्रोच्या घश्यात घालण्याचा डाव पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आखला असल्याचा आरोप करत आयुक्तांच्या या भूमिकेला माजी उपमहापौर आबा बागूल यांनी कडाडून विरोध केला आहे.

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी महामेट्रो प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी पुणे शहरातील विविध भागातील जमिनी महामेट्रोला महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. यातील एक जागा स्वारगेट येथील आहे. तेथे मेट्रोच्या वतीने व्यापारी संकुल उभारले जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Municipal Corporation
Ravindra Dhangekar Demand Governor: बेजबाबदार सरकारला भानावर आणा; धंगेकरांनी केली राज्यपालांकडे मागणी!

त्यातील 50 टक्के हिस्सा पालिकेला मिळणे गरजेचे आहे. यामधून पुणेकरांचे हित साधले जाणार आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत पालिका आयुक्तांनी ही जागा मेट्रोला देण्याचे ठरविले आहे. हा प्रकार म्हणजे 'महामेट्रो तुपाशी अन् पुणेकर उपाशी' असल्याची टीका बागूल यांनी केली आहे. हा प्रकार अन्यायकारक असून हे खपवून घेतले जाणार नाही, असेही बागूल म्हणाले.

महामेट्रोला सार्वजनिक हितासाठी दिलेल्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या व्यापारी संकुलातून 50 टक्के हिस्सा हा पुणे महानगरपालिकेला मिळणे बंधनकारक आहे. तसा ठराव स्थायी समितीमध्ये मान्य करून मुख्य सभेनेदेखील मंजूर केलेला आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या अनुकूल अभिप्रायासह हा ठराव मंजूर झालेला आहे. त्यामुळे 50 टक्के हिस्सा पुणे महापालिकेला महामेट्रोने देणे बंधनकारक आहे.

सध्या पालिकेत मुख्य सभा अस्तित्वात नाही. लोकप्रतिनिधींची समिती अस्तित्वात नसताना आपण प्रशासनाने परस्पर या सार्वजनिक जागेला व्यापारी उपयोगासाठी मान्यता देणे चुकीचे आहे. या व्यापारी संकुलातून मिळणारे उत्पन्न सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरणे गरजेचे आहे. पुणे महापालिकेने सार्वजनिक हितासाठी या जागा ताब्यात घेतलेल्या आहेत.

त्याचा हेतू परस्पर बदलल्यास (कमर्शियल) झाला तर या जागा मूळ मालकाला परत द्याव्या लागतील. या सर्व गोष्टींचा विचार करून आयुक्तांनी महामेट्रोशी कोणताही नवीन करार करू नये, अशी मागणी बागूल यांनी केली आहे. याकडे दुर्लक्ष करत मनमानी सुरू ठेवल्यास कोर्टात जाण्याचा इशारादेखील बागूल यांनी दिला आहे.

Edited By-Ganesh Thombare

R

Pune Municipal Corporation
Ajit Pawar Baramati Rally : 'पक्ष चोरला नाही, रितसर मिळाला'; अजितदादांचा बारामतीत एल्गार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com