मंचर : खेड तालुक्यातील दावडी निमगाव येथे खंडोबाच्या यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीच्या (Bullock cart race) घाटात बुधवारी (ता.१६) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) आले. ते पहिल्या बारी समोर नव्हे तर आर्धी यात्रा झाल्यानंतर घोडीवर बसले. घोडीवर बसल्यामुळे घोडी राहिली मागे, अन् बैल पुढे पळाले. अशा प्रकारचा त्यांनी शब्द पूर्ण केला, असा खोटक टोला शिवसेनेचे (shivsena) उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी यांनी कोल्हे यांना लगावला. त्यांनी शब्द वगैरे पूर्ण केला नाही. आवाहन स्वीकारले नाही. माझे आवाहन पूर्ण करायची हिम्मत डॉ. कोल्हे यांच्यामध्ये नाही. असेही ते म्हणाले.
बैलगाडा घाटामध्ये मी घोडीवर बसलो आणि मी शब्द पूर्ण केला. आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारले. अशा खोट्या वल्गना डॉ. कोल्हे करत आहेत. असा आरोप आढळराव पाटील यांनी केला. आढळराव पाटील म्हणाले 'डॉ. कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जनतेला शब्द दिला होता की 'बैलगाडा शर्यती सुरु होतील. त्या दिवशी हा पठ्या पहिल्या बारीसमोर घोडीवर बसेल. असे वचन जनतेला दिले होते. खर म्हणजे बैलगाडा शर्यतीवरील बंदी (ता. १६) डिसेंबर 20२१ रोजी उठली. १ जानेवारीला नानोली ( ता.मावळ ) व लांडेवाडी ( ता. आंबेगाव ) येथे बैलगाडा शर्यत सुरु झाल्या.
त्या ठिकाणी मी कोल्हे यांना आवाहन केले होते. कोल्हे यांना आव्हान पूर्ण करायचा असेल तर त्यांनी नानोली किंवा लांडेवाडीच्या यात्रेला यावे. बैलगाडा तज्ञ आणि शेतकरी यांना माहिती आहे की पहिल्या बारीसमोर घोडीवर कसे बसतात. बुधवारी डॉ. कोल्हे ज्या घोडीवर बसले होते. ती घोडी घाटामध्ये बैलांपुढे पळणारी नव्हती.
नाटक, तमाशा आणि सिनेमांमध्ये पळणारी घोडी होती. ती पुण्यावरून आणली होती. त्या घोडीवर ते बसले. बसायला काहीतरी वेगळे आसन होते. शेतकऱ्यांची घोडी नव्हती आणि त्यांनी माझा शब्द पूर्ण केला किंवा माझ आव्हान स्वीकारले. अशा प्रकारच्या मीडियामध्ये लोकांना बनवाबनवीण्याचे काम ते जस सिरीयलमध्ये आणि सिनेमाध्ये करतात तसे त्यांनी केले.
त्यांना वाटले आपण शब्द पूर्ण केला आहे. शब्द पूर्ण केला नाही. खरी बारी झाली लांडेवाडी या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्यात यशस्वी, भव्यदिव्य बैलगाडा शर्यत माझ्या गावामध्ये लांडेवाडीत शुक्रवारी (ता.११) व शनिवारी (ता.१२) झाली. महाराष्ट्रमध्ये यापूर्वी कधी अशी यात्रा झाली नाही आणि यापुढे होणार नाही. हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, असे आढळराव पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.