कंपनीत गाड्या लावतो, असे सांगून माजी सरपंचाने २५० जणांना लावला कोट्यवधींचा चुना

दोन कोटी रुपयांच्या वीस आलिशान मोटारी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
Cars
CarsSarkarnama

पिंपरी : मोटारी कंपन्यांत भाड्याने लावतो, असे सांगून अडीशचेपेक्षा जास्त लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या साबळेवाडीच्या (ता. खेड, जि. पुणे) माजी सरपंचाला भोसरी पोलिसांनी बीड येथून पकडून आणले आहे. त्यासाठी दोन दिवस पोलिस पथकाला तेथे वेशांतर करून दबा धरून बसावे लागले होते. त्याच्याकडून ऑडी, फॉक्सवॅगन अशा दोन कोटी रुपयांच्या वीस आलिशान मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने खेड, बारामती, दौंड येथील किमान अडीचशे जणांच्या मोटारी कंपनीत न लावता त्या गहाण ठेवून पैसे उकळले आहेत. (Former sarpanch defrauded 250 people of crores of rupees)

सागर मोहन साबळे (वय ३४) असे या ठकसेन माजी सरपंचाचे नाव आहे. त्याला भोसरी पोलिस ठाण्याचे फौजदार प्रशांत साबळे व पथकाने बीड येथे मोठ्या शिताफीने पकडले. पुणे जिल्ह्यातील खेड (५५), दौंड व बारामती (२०) आणि पिंपरी-चिंचवड (७०) येथून त्याने घेतलेल्या गाड्या बीडमध्ये विकल्या होत्या. या मोटारींचे मालक जुगारात हरलेले तसेच कर्जबाजारी झालेल्यांच्या असल्याचे त्या माझ्याकडे गहाण ठेवलेल्या आहेत. त्यांचे मालक पैसे देत नाहीत, तोपर्यंत तुमच्याकडे गहाण ठेवा, असे सांगून तो त्यापोटी वीस-तीस लाखाच्या मोटारींचे फक्त दोन, अडीच लाख रुपये घेत होता. पोलिसांना तो सतत गुंगारा देत होता. त्यासाठी तो आपल्या गावीही काही महिने गेला नव्हता.

Cars
आमच्या शक्तीपीठावर हल्ला करणाऱ्या भाजपला मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्रकार परिषद घेऊन भोसरी पोलिसांच्या या कामगिरीचे जाहीर कौतुक केले. एवढेच नाही, तर त्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीसही दिले. तसेच स्वस्तात मोटार मिळतेय म्हणून विकत घेऊ नका. फसवणूक होईल. खातरजमा करीत योग्य व खऱ्या मालकाकडून ती कायदेशीरपणे विकत घ्या, असे आवाहन आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले आहे.

Cars
भाजपच्या आशिष शेलारांनी सांगितले राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण...

माझी खूप ओळख असून तुमच्या गाड्या कंपन्यात लावतो. महिन्याला चांगला मोबदला देतो, असे सांगून आरोपी साबळे याने अनेकांच्या मोटारी नोटरी करून घेतल्या होत्या. सुरुवातीला दोन-तीन महिने मोबदला देत त्याने विश्वास संपादन केल्याने त्याला त्यानंतर अनेक मोटारी मिळाल्या होत्या. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या दोन एजंटलाही अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सहाय्यक पोलिस आयुक्त सागर कवडे, भोसरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्नाखाली फौजदार साबळे, हवालदार बोयणे, राजू जाधव, पोलिस नाईक अजय डगळे, बाळासाहेब विधाते, पोटे, पोलिस शिपाई सागर जाधव, आशिष गोपी या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com