निरगुडसर (जि. पुणे) : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लाकडाचा कौलारू शेड कोसळून पुणे (Pune) जिल्ह्याच्या आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील जवळे गावच्या माजी सरपंच (Former Sarpanch) रंगूबाई धोंडिभाऊ काळे (वय ५०) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (ता. ११ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. (Former Sarpanch dies after wooden shed collapses in Pune district)
आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील लायगुडे मळ्यातील ठाकर समाजाच्या माजी सरपंच रंगुबाई धोंडीभाऊ काळे यांच्या घराशेजारी कौलारू लाकडी शेड होता. त्यामध्ये स्वयंपाक व इतर कामे केली जायची. दिवसभर पाऊस असल्याने, तसेच शेतात काही काम नसल्याने त्या शेडमध्ये एकट्याच बसल्या होत्या. त्यांचे राहते घर चांगले असून घराशेजारी असणाऱ्या कौलारू शेडची लाकडं जीर्ण झाल्याने पावसात भिजून ते रंगूबाई यांच्या अंगावर कोसळले.
या घटनेत माजी सरपंच रंगूबाई काळे यांच्या डोक्याला मार लागला. ही घटना घडल्यानंतर शेजारी राहणाऱ्या इंदुबाई गावडे तातडीने त्या ठिकाणी येऊन आरडाओरड केल्यानंतर आसपासचे नागरिक गोळा झाले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सुरुवातीला पारगावला नेण्यात आले. त्यानंतर मंचर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यांच्या मागे पती, सासू, मुलगा असा परिवार आहे त्यांनी २०१५ ते २०२० या कालावधीत गावचे सरपंच भूषवले होते. निरगुडसरचे तलाठी विश्वनाथ मुगदळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.