Pune News : महाआघाडीची सत्ता जाताच सोमय्यांना धक्काबुकी करणाऱ्या शिवसेनेच्या चौघांना अटक : गुन्ह्यांची कलमेही वाढवली

Kirit Somaiya Attacked by Shiv Sena Supporters : किरीट सोमय्यांना पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात चार जणांना अटक
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून 5 फेब्रुवारी 2022 रोजी धक्काबुक्की करण्यात आली होती.

सोमय्यांना पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात पुण्याचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) 8 पदाधिकाऱ्यांवर वाढीव कलम टाकून भादंवि कलम 353 नुसार (शासकीय कामात अडथळा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kirit Somaiya
Bazar Samiti Election : देवदत्त निकम वळसे-पाटलांना धक्का देणार का? मंचर बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान, निकालाकडे लक्ष

यामध्ये निलेश राउत, विकी धोत्रे, अजिंक्य पांगारे, बाळासाहेब गरुड या चार जणांना शिवाजीनगर पोलीसांनी आज पहाटे अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांची जामीन मंजूर होईपर्यंत येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

भाजप नेते किरीट सोमय्या हे 5 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे महापालिकेत आले असता महापालिकेच्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले होते. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना पाहून किरीट सोमय्या यांनी आपला पुण्यातील कार्यक्रम रद्द करत महापालिकेतून काढता पाय घेतला होता.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com