Bazar Samiti Election : देवदत्त निकम वळसे-पाटलांना धक्का देणार का? मंचर बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान, निकालाकडे लक्ष

सर्वाधिक मते कोणाला पडणार?, कोण पराभूत होणार? याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.
Manchar Bazar Samiti election
Manchar Bazar Samiti electionSarkarnama

पुणे : मंचर (Manchar) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत शुक्रवारी (ता. २८ एप्रिल) चुरशीने ९७.८१ टक्के मतदान झाले. ही निवडणूक बाजार समितीचे विद्यमान सभापती देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादीने (NCP) उमेदवारी नाकारली. त्यानंतर निकम यांनी बंडखोरी करत नेत्यांनाच आव्हान दिले, त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. निकम वळसे पाटलांसह राष्ट्रवादीला धक्का देणार की इतर नेत्यांप्रमाणेच त्यांची बंडखोरीही फुकाचीच ठरणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. अनेक उमेदवारांच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांकडून पैजा लावण्यात आलेल्या आहेत. (98 percent turnout for Manchar Bazar Committee)

बाजार समितीच्या १५ जागांसाठी डिंभे, घोडेगाव, मंचर, निरगुडसर या मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. कृषी पतसंस्था व ग्रामपंचायत या दोन्ही गटात एक हजार ५५८ मतदारांपैकी एक हजार ५२४ मतदारांनी मतदान केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकार) पी. एस. रोकडे यांनी दिली.

Manchar Bazar Samiti election
Bazar Samiti Result : मंगळवेढ्यात आवताडेच 'बॉस' : बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर वर्चस्व; राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांना फक्त दोन मते

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रथमच गाजली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडी, तर शिवसेना, भाजपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर नेते देवदत्त निकम, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले अशी तिरंगी लढत येथे झाली. समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. पण, महाविकास आघाडीने तीन जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यामुळे संचालाक पदाच्या १५ जागांसाठी निवडणूक मतदान झाले.

तीन पॅनेलचे ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वानीच आपणच विजयी होणार, असा दावा केला आहे. बाजार समितीची शनिवारी (ता.२९ एप्रिल) सकाळी दहा मातमोजणी होणार आहे.निवडणूक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Manchar Bazar Samiti election
Bhor Bazar Samiti Result : सोसायटीत थोपटेंचे उमेदवार आघाडीवर; तर ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीयांची ‘काँटे की टक्कर’!

मतदान केंद्र : कृषी पतसंस्था व ग्रामपंचायत मतदारांची एकूण संख्या व झालेले मतदान

  • डिंभे : मतदार संख्या २९९ - झालेले मतदान २८९

  • घोडेगाव : मतदार संख्या २७९ - झालेले मतदान १७२

  • मंचर : मतदार संख्या ५०२ - झालेले मतदान ४९४

  • निरगुडसर : मतदार संख्या ४७८ - झालेले मतदान ४६९

Manchar Bazar Samiti election
Bazar Samiti Election : भाजप-राष्ट्रवादी आमने सामने आलेल्या बारामतीत ९७ टक्के मतदान

या दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद

आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढोबळे, बाजार समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते देवदत्त निकम, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अरुण गिरे, भारतीय जनता पक्ष आंबेगाव तालुकाध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे, रामचंद्र गावडे, नीलेश थोरात,मयुरी भोर, संदीप थोरात, जे .के थोरात, रत्ना विकास गाडे, मयुरी भोर आदी दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोण विजयी होणार?, सर्वाधिक मते कोणाला पडणार?, कोण पराभूत होणार? याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. काही उमेदवारावर तर पैजा लागल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com