Amol Kolhe News
Amol Kolhe NewsSarkarnama

Amol Kolhe News: दाल में कुछ काला है! : लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडूनच लढणार असं कोल्हे ठामपणे का म्हणत नाहीत?

Pune News :आगामी लोकसभा कोणत्या पक्षाकडून लढायची; खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी टाकली गुगली
Published on

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेकवेळा राजकीय वर्तुळात झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी गुगली टाकली आहे, त्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे.

"आगामी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, लढवली तर कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या मतदारसंघातून लढायची, याबाबत अद्याप काही ठरवलेले नाही. योग्यवेळी परिस्थिती पाहून निर्णय घेईन", असं सूचक विधान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

Amol Kolhe News
Maharashtra Poltical Crisis: सत्तासंघर्षाचा निकाल येण्याआधी विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळांचं मोठं विधान; नोटीस देण्याचा निर्णय...

अमोल कोल्हे यांच्या या विधानामुळे ते निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार, याबबात त्यांनीच सस्पेन्स वाढवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

पुढची लोकसभा लढवायची की नाही, कोणत्या मतदारसंघातून लढायची, हे ठरवलेले नाही, असे सांगत खासदार कोल्हेंनी संभाव्य प्रतिस्पर्धी आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे टेन्शन आणखी वाढवले आहे.

Amol Kolhe News
Pradeep Kurulkar update: कुरुलकरांनी नेमकी काय माहिती पाकिस्तानला पुरविली? एटीएस'कडून खुलासा नाहीच!

"बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यानुसार, एखादा मतदारसंघ म्हणजे आपली मक्तेदारी आहे, असे मानणे चुकीचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मतदारसंघात संपर्क कमी आहे, हे मान्य करत त्याचवेळी विकासकामांसाठी आवश्यक पाठपुरावा सुरू आहे", असेही खासदार कोल्हेंनी यावेळी स्पष्ट केले.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com