DRDO director Pradeep Kurulkar update : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) चे माजी संचालक प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून 5 मे ला अटक केली. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरांवर पाकिस्तानला व्हाट्सअॅ्प कॉल आणि मॅसेंजरवरुन संरक्षण विभागातील गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एक मोठी अपटेड समोर आली आहे. (What information exactly did Kurulkar provide to Pakistan? No disclosure from ATS!)
कुरुलकर यांनी पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या गोष्टीला जवळपास आठवडा लोटला. कुरुलकर हे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा ATS कडून करण्यात आला. त्यांची चौकशीही करण्यात आली. पण अद्याप कुरुलकर यांनी शत्रू राष्ट्राला कोणती माहिती पुरवली आहे. त्यात माहितीत काय काय सांगितलं, ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्र एटीएस'ने अद्याप याबाबत मिडीयासमोर कोणताही खुलासा केलेला नाही. यामुळे या प्रकरणाची उत्सुकता आता वाढू लागली आहे. (Pradeep Kurulkar Latest news)
गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे म्हणजेच DRDO चे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना मंगळवारी (९ मे) कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने कुरुलकर यांची कोठडी १५ मे पर्यंत वाढवली. यावेळी अन्य एक अधिकारी हनी ट्रॅप मध्ये अडकल्याची माहितीही समोर आली आहे.
संबंधित अधिकारी देखील अश्याच प्रकारे हनीट्रॅपमध्ये (Honey trap) अडकाल्याचा संशय ATS ला आहे. जो पाकिस्तानी गुप्तचर विभागाचा ऑपरेटिव्हने महिलेच्या वेशात कुरुलकर यांना भुरळ घातली होती. तोच भारतीय दुसऱ्या एका गुप्तचर अधिकाऱ्याच्याही संपर्कात असल्याचं तपासात समोर आलं आहे. या अधिकाऱ्याचीदेखील चौकशी सुरु आहे. संबंधित अधिकाऱ्याचा आयफोन आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आला असून या अधिकाऱ्याने महिलेसोबत कोणतीही गोपनीय माहिती शेअर केली आहे याची चौकशी सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या वर्षी सप्टेंबर - ऑक्टोंबर दरम्यान व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल द्वारे होते पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या ऑपरेटिव्हशी संपर्कात होता. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या तांत्रिक उपकरणांच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय आहे. तसेच, परदेशवारी दरम्यान परदेशात पाकिस्तानी ऑपरेटिव्हशी भेट झाली की नाही याचाही तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाची कुणकुण भारताच्या गुप्तहेर यंत्रणांना या आधीच लागली होती. त्यामुळे कुरुलकर यांची या आधीच बदली देखील करण्यात अली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांना अटक करण्यात आली.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.