
Baramati, 16 January : बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दरवर्षी कृषी प्रदर्शन भरवलं जातं. पण, बारामतीच्या कृषी प्रदर्शनाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष जमिनीत कशी पिके घेतली जातात, हे येथे पाहायला मिळते. आपल्यामध्ये बसलेल्या लोकांपैकी सर्वांत उंच असलेल्या माणसाच्या उंचीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल नऊ फूट उंचीचा भोपळा पिकवला आहे. हे असं कोणी सांगितलं, तर म्हणतील दुपारीच ह्याला चढलेली आहे, असं म्हणतील. पण, ही वस्तुस्थिती आहे, ती आपण पाहिली पाहिजे, असे मजेशीर विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलं.
बारामती (Baramati) कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषक कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाले. त्या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी हे विधान केले.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवायचं होतं. पण, पंतप्रधानांचा कार्यक्रम आला आणि आम्हाला कार्यक्रम बदलावे लागले. कबड्डी स्पर्धेचा कार्यक्रम घ्यावा लागला. त्यामुळे मी माणिकराव कोकाटे, पंकजाताई मुंडे आणि दत्तातेय भरणे यांना विनंती केली की, आपण बारामतीला कार्यक्रमाला जाऊया. पंतप्रधानांचा कार्यक्रम झाला आणि आम्ही त्यांची परवानगी घेऊन कबड्डी स्पर्धेचे उदघाटन केले.
मी पंकजाताई आणि माणिकरावांना म्हटलं, ‘तुम्ही मुक्काम करा. आपल्याला कृषी प्रदर्शनाच्या उद॒घाटनाला जायचं,’ अशी मी त्यांना विनंती केली. दत्तात्रेय भरणेंनाही आणणार होतो. पण त्यांच्या विभागाची आढावा बैठक आहे, त्यामुळे त्यांना परत जावं लागलं.
कांद्याचे राजगुरुनगरला संशोधन झाले आहे. तो कांदा तब्बल नऊ महिने टिकतो. माणिकराव, आपल्याला राज्य सरकारच्या सर्वच विभागांचा उपयोग सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करू. राजेंद्र पवार यांना मी सांगितलं की, तुम्ही नोट करून द्या. त्या प्रमाणे आपण टप्प्याटप्याने लक्ष घालू. बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला गेल्यानंतर, आप्पासाहेब पवार यांची आठवण कायम येते, अशी आठवणही अजितदादांनी जागवली.
अजित पवार म्हणाले, आप्पासाहेबांच्या स्वभावातील काही भाग राजेंद्र पवार यांच्यात उतरला आहे, असं मला माणिकराव सांगत होते. मग, मी रणजित पवार यांच्यात काही उतरला आहे का?, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी त्यांच्यात नाही असं म्हटलं. माणिकराव तुम्ही एवढ्या लवकर ओळखू शकता, याची मला गंमत वाटते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.