Ganesh Festival Pune : पुण्यातल्या गर्दीत चंद्रकांत पाटलांनी केला दुचाकीवरून प्रवास !

गणेशोत्सवामुळे पुण्यात वाहतुकीच्या मार्गात पोलिसांनी बदल केले आहेत.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवाला (Genesh Festival Pune) आज मोठ्या थाटात सुरूवात झाली. मानाच्या पाच गणपतींबरोबरच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ तसेच भाऊ रंगारी गणपती मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मानाच्या सर्व गणपतींचे दर्शन पोलिसांबरोबर दुचाकीवरून प्रवास करीत घेतले.

Chandrakant Patil
पंकजा मुंडे नाराज आहेत का? भागवत कराडांनी स्पष्टच सांगितले

गणेशोत्सवामुळे पुण्यात वाहतुकीच्या मार्गात पोलिसांनी बदल केले आहेत. मिरवणुकीमुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे स्वतंत्र वाहन व्यवस्थेऐवजी चंद्रकांत पाटील यांनी ट्रॅफिक पोलिसांसोबत दुचाकीवरून प्रवास करून गणपतींचे दर्शन घेतले.

Chandrakant Patil
Lalbaugcha Raja : पहिल्याच दिवशी महिला भाविक-सुरक्षारक्षक भिडले, लालबागचा राजाच्या दरबारात धक्काबुक्की

पाटील यांच्या हस्ते श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर पाटील यांनी काही मंडळांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमंडळाच्या विद्युत रोषणाईचे उदघाटन होणार आहे.

Chandrakant Patil
सोलापूरात मशरूम गणपती मंदिराचा २८ तोळ्याचा कळस चोरीला...

गणेशोत्सवाच्या दहा दिवसात पुण्याबाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. विसर्जन मिरवणुकीला ही संख्या अधिक असते. त्यामुळे या काळात वाहतूक व वाहनांच्या पार्किंचा प्रश्‍न निर्माण होतो.या काळात नागरीकांनी पोलिसांनी वाहतूक व पार्कींगबाबत केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणेकरांनी ज्या रस्त्यावर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्या रस्त्यांवर वाहने नेऊ नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनेक भागात आज मिरवणुका आहेत. मात्र, कोणता रस्ता बंद आहे याची नेमकी कल्पना नसल्याने अनेकांनी वाहने रस्त्यावर आणल्याने आज सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com