पुणे : आपल्याला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य ही तर भीक असून खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, असे वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी कंगनाच्या विरोधात तक्रार केली आहे. या वक्तव्यावरून कंगनाच्या विरोधात मुंबईतही एक तक्रार दाखल झाली असून त्यापाठोपाठ पुण्यातही तक्रार दाखल झाल्याने कंगनाच्या अडचणी वाढणार आहेत.उत्तरकर यांनी तक्रारी दिली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
कंगनाचे वक्तव्य देशविरोधी आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणाऱे असल्याने तिच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी उत्तरकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंगना हिने देशाला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्यााबद्दल मत व्यक्त केले होते. १९४७ चे स्वातंत्र्य ही ब्रिटीशांनी दिलेली भीक होती. खरे स्वातंत्र्य तर २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मिळाल्याचे कंगनाने या वक्तव्यातून सुचविले होते.
देशाची संस्कृती आणि परंपरेबद्दल अभिमान बाळगण्यात गैर काय. खरेतर एखाद्या राजकीय पक्षाने ही भूमिका घेण्याऐवजी देशातील प्रतयेक नागरीकाने असे वागायला हवे, असे कंगनाने याच मुलाखतीत म्हटले होते.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.