
Pune Gang war: पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गँगवॉर झाल्याची माहिती समोर येत आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येचा हा बदला असल्याची चर्चा सुरु आहे. ज्या ठिकाणी आंदेकर याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्याच ठिकाणी त्याचा बदला घेतला गेला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली होती.
पुण्यातील नाना पेठेत हे हत्याकांड घडलं आहे. गोविंदा गणेश कोमकर या तरुणाची या गँगवॉरमध्ये तीन गोळ्या झाडून आंदेकर टोळीकडून हत्या करण्यात आली. आंदेकर आणि कोमकर या टोळीमध्ये हे गँगवॉर झालं आहे. गोविंदा कोमकर हा वनराज आंदेकर याचा सख्खा भाचा होता. यामध्ये मामाच्या हत्येचा बदला हा त्याच्याच सख्या भाच्याची हत्या करुन घेतला गेला आहे. वनराज आंदेकर याच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी संजीवनी कोमकर याचा गोविंदा कोमकर हा पुतण्या तर वनराजच्या हत्येतील दुसरा आरोपी गणेश कोमकर याचा गोविंदा हा मुलगा आहे.
वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला खुनानेच घ्यायचा असा प्लॅन आंदेकर टोळीनं केला होता. या प्लॅनचा सुगावा दोनच दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना लागला होता. रविवारी पोलिसांनी आंबेगाव परिसरातील एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर पुण्यात अशा पद्धतीनं आंदेकरचा बदला घेण्याचा प्लॅन सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्लॅनची खबर मिळाल्यानं पोलिसांनी हा गँगवॉरचा कट उधळला असल्याची चर्चा दोन दिवसांपूर्वी सुरु होती.
परंतू आंदेकर टोळीनं अखेर आपला प्लॅन यशस्वी केल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळं पोलिसांकडं याबाबतची सगळी टीप असतानाही शहरातील मध्यवस्तीत अशा प्रकारे गोळ्या घालून एकाचा खून कसा काय केला गेला? माहिती असतानाही पोलीस काय करत होते? असे प्रश्न या निमित्त उपस्थित झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.