मेळावे हे निष्ठावंताचेच असतात; युवासेने शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळलं...

Dasara Melava| दसऱ्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा शिवसेना-शिंदे गटातील वादही अधिक तीव्र होताना दिसत आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

पुणे : दसऱ्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा शिवसेना-शिंदे गटातील वादही अधिक तीव्र होताना दिसत आहे. मुंबईसह पुण्यातही हा वाद आता शिगेला जाण्याची चिन्हे निर्माण दिसू लागली आहेत. बॅनरबाजीमुळे आधीच दोन्ही गटात धुसफूस सुरु असताना आता पुणे शहरात युवा सैनिकांनी लावलेला बॅनर सध्या चर्चे विषय ठरत आहे.

"मेळावे हे निष्ठावंताचेच असतात.' दसरा मेळाव्याच्या आधीच युवा सेनेने बाजी मारली; पाहा कुठे लागलेत बॅनर" असा मजकूर असलेले बॅनर सध्या पुण्यात झळकत आहे. त्यामुळे पुण्यातील शिवसेनेचे बॅनर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत.

Aditya Thackeray
अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर: ३ नोव्हेंबरला मतदान

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात गटाला वेगवेळ्या संघटनांचे, पक्षाचे लोक येऊन पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे खरे निष्ठावंत कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरेंंचाही पुणे दौरा देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पुण्यातील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला भेटी देत आहे. त्यातच असे बॅनरही सामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना नक्की कुणाची आणि खरे निष्ठावंत कोण हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तर दूसरीकडे शिंदे गटाच्या वतीनेही ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर शिवसेनेचे जुने वाघाचे चिन्ह वापरण्यात आले असून त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोही लावला आहे. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन खोपट येथील उड्डाणपुलावर, "शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार", असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. त्यासोबतच, 'एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ', असं देखील बॅनरवर लिहीण्यात आलं आहे.

याशिवाय ५ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई बीकेसी मैदान येथे पार पाडणाऱ्या दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, या बॅनरच्या माध्यमातून शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com