Ghodganga Sugar Factory : कामगारांचे पगार, शेतकऱ्यांची देणी रखडली; ऋषिकेश पवारांची दिलगिरी

Rushikesh Pawar Shirur : घोडगंगा साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देणार...
Rushikesh Pawar
Rushikesh PawarSarkarnama

Shirur Political News : कामगारांचे वर्षभराचे पगार आणि इतर देणी रखडली, शेतकरी सभासदांना देय रक्कम उशिरा मिळाली, याबाबत दिलगिरी व्यक्त करत घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश पवारांनी कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, वर्षभराचा पगार रखडल्याने घोडगंगा कारखान्याच्या कामगारांनी सुमारे तीन महिने आंदोलन केले होते. त्यावर योग्य मार्ग काढण्यात कारखाना प्रशासनाला यश आले. त्यामुळे कामगारांनी गुरुवारी आंदोलन मागे घेतले. (Latest Political News)

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. या वेळी ऋषिकेश पवारांनी कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, 'वेळेत सहवीज प्रकल्प कार्यान्वित करूनही तत्कालीन सरकारने वीज खरेदी करार वेळेत केला नाही. तसेच प्रतियुनिट सहा रुपये ६७ पैशांऐवजी फक्त चार रुपये ९९ पैसे या दराने वीज खरेदी केली. त्यामुळे कारखान्याला मोठे आर्थिक नुकसान झाले. याचा परिणाम कामगारांचे पगार आणि शेतकऱ्यांच्या देण्यावर झाला. या सर्व अडचणींवर मात करून आगामी काळात संचालक मंडळ कारखान्याला गतवैभव मिळवून देईल,' असा शब्द ऋषिकेश पवारांनी दिला.

Rushikesh Pawar
Manoj Jarange Maharashtra Tour : मनोज जरांगेंचे दौरे वाढले; राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार ?

'उसाला जास्तीचा दर देण्यासाठी आसवणी प्रकल्पाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे. भांडवल वाढीसाठी लवकरच सभासद संख्याही वाढवणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम उशिरा दिली. तसेच कामगारांचीही देणी रखडली आहेत. अशा स्थितीतही कारखान्याला सहकार्य केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारखान्याकडे सुमारे आठ हजार ७०० हेक्टरवरील उसाची नोंद झाल्याने यंदाचा गळीत हंगाम निश्चित चांगला पार पडेल,' असा विश्वासही ऋषिराज पवारांनी व्यक्त केला. (Maharashtra Political News)

शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगेंनी घोडगंगा कारखाना टिकला पाहिजे, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले, परिसरातील कारखान्यांनी तीन हजार रुपयांहून अधिक दर जाहीर केला आहे. यंदाच्या गळीत हंगामातील उसासाठी प्रतिटन कारखान्याने तीन हजार रुपये बाजारभाव जाहीर करावा, अशीही मागणी केली.

या वेळी आमदार अशोक पवार, उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादीचे रवींद्र काळे, शशिकांत दसगूडे, महेश ढमढेरे, अॅड. सुरेश ढमढेरे, बाळासाहेब घाडगे, सुधीर फराटे, शरद गद्रे, सागरराजे निंबाळकर, निखील तांबे, स्वप्नील ढमढेरे, निखिल तांबे आदींसह कारखान्याचे आजी-माजी संचालक व सभासद उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Rushikesh Pawar
Eknath Shinde Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com