Jitendra Awhad on banners of Jagdish Mulik Future MP : पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे नुकतेच निधन झाले आहे. बापटांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
बापटांच्या निधनानंतर अवघ्या तीनच दिवसात पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आज (१ एप्रिल) वाढदिवस, यानिमित्ताने मुळीक यांना शुभेच्छा देणारे फलक त्यांच्या समर्थकांची विविध ठिकाणी लावले आहेत, यात आणखी भर म्हणून अतिउत्साही कार्यकर्त्यांनी जगदीश मुळीक यांचा 'भावी खासदार' असा उल्लेख करीत त्यांचे बॅनर लावले होते.
याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हे बॅनर काढण्यात आले. या साऱ्या प्रकारावर राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करीत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी असे बॅनर लावणाऱ्यांचा चांगलेच सुनावलं आहे.
हाच का तुमचा वेगळे पणा..
"दहा दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बॅनर का तुम्ही वाटच बघत होतात… आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत..हाच का तुमचा वेगळे पणा.. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत..तोवरच तुम्ही बॅट पॅड घालून तयार.." अशा शब्दात आव्हाडांनी संपात व्यक्त केला आहे.
जनाची नाही मनाची तरी ठेवा..
या बॅनरवर झळकल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी भाजपची लाज काढत बॅनर टि्वट केले आहेत. चव्हाण यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा, अशा शब्दात चव्हाण यांनी टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.