Girish Bapat News : गिरीश बापटांचे कसबेकरांना पत्र लिहिण्यास कारण की...

Kasba Election : प्रकृती अस्वास्थ्यामुळे थेट प्रचारात सहभागी होण्यास मर्यादा
Girish Bapat, Hemant Rasane
Girish Bapat, Hemant RasaneSarkarnama
Published on
Updated on

Girish Bapat's Letter: भाजपचे खासदार गिरीश बापट हे कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय नाहीत. पण त्यांनी पत्र लिहून मदतीला धावले आहेत. गेली तीन दशके मतदारांच्या संपर्कात असलेल्या बापाट यांनी आज कसब्यातील मतदारांसाठी पत्र लिहिले आणि भाजपला पुन्हा एकदा विजयी करा, असे भावनिक आवाहन केले आहे.

बापट यांनी लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे:

मतदार बंधू भगिनींनो,

सप्रेम नमस्कार.

कसबा विधानसभा मतदारसंघात मुक्ताताई टिळक (Mukta Tilak) यांच्या दुर्देवी निधनामुळे पोटनिवडणूक होते आहे. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाहीर प्रचारात सहभागी होण्यास मर्यादा आहेत; परंतु कसब्यातील मतदार भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी अनेक दशके भक्कमपणे उभा राहिला आहे. याहीवेळेस तो राहणार आणि विजयाची परंपरा कायम राहणार, याबाबत माझ्या मनात विश्वास आहे.

Girish Bapat, Hemant Rasane
Supreme Court hearing : मोठी बातमी; महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार

पुणे शहर (Pune) व कसब्याने मला आजवर भरभरून प्रेम दिले आहे. सर्व समाजांचा कमावलेला विश्वास ही माझी दौलत आहे. याच कसब्याने माझ्या सार्वजनिक जीवनाला आणि राजकीय कारकिर्दीला आकार दिला. नगरसेवक, आमदार, खासदार, पालकमंत्री या माझ्या प्रवासात कसब्याचे स्थान विशेष राहिले आहे. प्रत्येक घटकाशी संवाद ठेवायचा, कार्यकर्त्याशी मैत्रीजोडायची, या माझ्या नीतीमुळे उदंड प्रेम मला लाभले. खूप कामे मार्गी लावता आली.

Girish Bapat, Hemant Rasane
Eknath Shinde : अडीच वर्षे रखडलेली कामे सहा महिन्यात मार्गी; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

भाजपाचा हिंदुत्वाचा विचार, विकास आणि राष्ट्रीयत्वाशी नाते सांगणारा आहे. आणि म्हणूनच सारा कसबा सदैव भाजपाला साथ देत आलेला आहे. यामुळेच कसबा (Kasba) म्हणजे भाजपा (BJP), कसब्यात कमळच हे समीकरण अभेद्य आहे, अजेय आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा प्रत्येक निवडणुकीत तुमचे पाठबळ भाजपालाच राहिले आहे, याविषयी मी कृतज्ञ आहे!

Girish Bapat, Hemant Rasane
Tripura Election : त्रिपुरामध्ये 81% वोटींग : मतदान दरम्यानच्या १० ठळक घडामोडी काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशात गतीमान विकास सुरू आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाला पुन्हा गती आलेली आहे. दाखवण्यासाठी नव्हे तर भविष्य समृद्ध करण्यासाठी कामे करायला हवीत, यावर माझा विश्वास आहे. पुणे महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपने हे कृतीतून दाखवून दिले आहे.

Girish Bapat, Hemant Rasane
Ramesh Bais : नवनियुक्त राज्यपाल रमेश बैंस शनिवारी घेणार शपथ

हेमंत रासने (Hemant Rasane) हा आमचा कार्यकर्ता या पोटनिवडणुकीतील भाजपा आणि मित्रपक्षांचा उमेदवार आहे. तीन वेळा नगरसेवक, स्थायी समितीचा तीनदा अध्यक्ष, गणेश मंडळाचा सेवाभावी कार्यकर्ता असलेल्या हेमंतने सोपवलेली जबाबदारी नेहमीच कार्यक्षमतेने पार पाडलेली आहे. या प्रत्येक भूमिकेला न्याय दिलेला आहे. तो कसब्याचा आमदार म्हणूनही आपले कर्तव्य चोख पार पाडेल. या पोटनिवडणुकीत त्याच्या आणि भाजपाच्या पाठीशी ताकदीने उभे राहा. विचार आणि विकासावरील आपली निष्ठा मतपेटीतून पुन्हा व्यक्त करा, ही माझी कळकळीची विनंती आहे.

धन्यवाद,

गिरीश बापट,

खासदार, पुणे

भारतीय जनता पार्टी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com