Eknath Shinde on Teachers Problems : अडीच वर्षात शिक्षक, शेतकरी, कष्टकरी, माता-भगीनी, विद्यार्थी यांच्या संबंधित अनेक निर्णय रखडलेले होते. ते या सहा महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. सामान्य घटक केंद्रबिंदू मानून आम्ही निर्णय घेतले.
समाजातील प्रत्येक घटक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तर शिक्षकांवरील शालाबाह्य कामांचा ताणही कमी करण्याचा निर्णय घेणार आहे, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी टोला लागवाले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आयोजित १७ वे त्रैवार्षिक महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्तिच्या जिवनातील शिक्षकांचे स्थान अधोरेखित केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, मी आणि उपमुख्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकत्रीत रित्या अनेक निर्णय घेत आहोत. त्यात शिक्षक, शेतकरी, कष्टकरी, माता-भगीनी, विद्यार्थ्यांबाबत निर्णयांचा समावेश आहे. सामान्य घटक केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले. समाजातील प्रत्येक घटक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय घेत आहोत.
शालाबाह्य ताण कमी करणार
शिक्षकांवर कोणत्याही प्रकारची बंधने टाकणार नाही. टाकू दिली जाणार नाही. मात्र तुमच्याकडूनही काही अपेक्षा आहेत. शिक्षकांनी अगदी मोकळेपणाने शिक्षण दानाचे काम केले पाहिजे. काही ठराविक गोष्टी सोडल्या तर पूर्वी दिले जाणारे काम आता दिले जाणार नाही. शिक्षणाव्यतिरिक्त काम काढून घेतले जाईल. रद्द केले जाईल. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी टिकविला पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिक्षकांना केले.
महाराष्ट्र देशात प्रथम
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील शैक्षणिक विभागाच्या कार्याची प्रतवारी केली जाते. त्यातील परफॉर्मन्स ग्रेडींग इंडेक्समधील एकूण एक हजार गुणांपैकी महाराष्ट्राने ९२८ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच्या शिक्षकांचे मोठं योगदान आहे. त्यामुळे शिक्षणविभागासह शिक्षकांचे अभिनंदनही शिंदे यांनी यावेळी केले.
शिक्षकांना पर्याय नाही
मातृभाषेत शिक्षण देण्याची गरज आहे. मोदींच्या नेतृत्वातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात मुलांमुलींसाठी समान शिक्षण देणार आहे. कितीही तंत्रज्ञान आले तरी शिक्षकांची जागा कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षणातील रिक्त पदे भरणार आहेत. राज्यातील ४ हजार ८०७ रिक्त केंद्रप्रमुख्यांची पदे भरणार आहे. तसेच शिक्षकांची ३० हजार पदे भरणार, असल्याचे शिंदे यांनी ग्वाही दिली.
विनाअनुदानीत शाळांना मदत
शाळाबाह्य मुले, मध्यान्य भोजन शिक्षण विभागातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी निर्णय घेतले जात आहेत. राज्यातील खासगी विना अनुदानीत शाळांच्या अनुदानाबाबत निर्णय घेऊन टाकला. त्यासाठी ६१ हजार शिक्षक आणि अकराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.