Pune News : केंद्रात नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी 2014 अखेर देशावर असलेली एकूण कर्जाची थकबाकी 53.87 लाख कोटी रुपये होती. ही थकबाकी आज (2024) मध्ये सुमारे 205 लाख कोटींच्या घरात गेली आहे. या “वाढीव कर्जफेडी बाबत” भाजपच्या जाहीरनाम्यात कुठेही मोदींची गॅरंटी, नियोजन किंवा कोणताही संकल्प का दिसत नाही? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी मोदी सरकार देशावरील स्वकाळात वाढलेले चौपट कर्ज सोईस्करपणे लपवत असल्याची प्रखर टीका काँग्रेसने केली.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 2009 ते 2014 या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने कच्चे तेल सुमारे 126 डॉलरने खरेदी करून सुध्दा, देशवासियांना पेट्रोल 68 रुपये प्रति लिटर, डीझेल 39 रुपये प्रति लिटर आणि घरगुती एलपीजी गॅस 390 रूपयांच्या किंमतीत उपलब्ध करून दिला होता. तरीही UPA सरकार काळात 'भारत आर्थिक महासत्ता’ होऊ घातला होता'. याचे स्मरण देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते तिवारी यांनी करून दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देशाची तत्कालीन आर्थिक परिस्थितीच्या वास्तवाची आठवण करून देताना तिवारी म्हणाले की, देशावर 2014 पर्यंतच्या एकुण 64 वर्षात व सुमारे 14 पंतप्रधानांची कारकिर्द मिळून, मात्र 53.87 लाख रुपयांचे कर्ज होते, मात्र आज मोदी सरकारच्या एकाच पंतप्रधान पदाच्या व 10 वर्षांच्या काळात (2024) मध्ये कर्जाची रक्कम तब्बल 205 लाख कोटींच्या घरात गेली आहे. या “वाढीव चारपट कर्जफेडी बाबत” भाजप’च्या जाहीर नाम्यात कुठेही मोदींची गॅरंटी वा संकल्प दिसत नाही.
तसेच देशातील राष्ट्रीय बँकांची लुट करून मल्या, मोदी, चोक्सी, ऋषी अग्रवाल यांनी नेलेला पैसा परत आणणे बाबत मोदींनी ‘जाहीर नाम्यात’ अवाक्षर ही काढलेले नाही. या विषयी काँग्रेस राज्य प्रवक्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
देशास कर्जबाजारी करणाऱ्या भाजपला मोदींच्या उधळपट्टीमुळे देशावरील ‘चौपट वाढीव कर्जाची’ जबाबदारी ही भाजपला घ्यावी लागेल. केवळ ‘मोदी हमी'चा प्रपोगंडा करत, रामा’चे नाव घेत व चोरीचे समर्थन करीत भाजप पळ काढू शकणार नाही. देशाच्या बुडत्या अर्थव्यवस्थेचे उत्तर भाजपला भावी काळात द्यावे लागेल, असा इशाराही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.