Rohit Pawar Vs Ajit Pawar : पवारांवर बांदलांची टीका; रोहित पवारांचा अजितदादांना खडा सवाल; म्हणाले...

Mangaldas Bandal : अजितदादांना सर्वात जास्त शरद पवारांनीच बदनाम केले. ते कधीही यशवंतराव चव्हाणांची उंची गाठू शकत नाहीत. त्यांना देवाने सदबुद्धी देवो, आणि सुप्रिया सुळेंचा अर्ज मागे घेवो, अशा शब्दांत बांदल यांनी पवारांवर घणाघात केला.
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : लोकसभा निवडणुकीत राज्याचे लक्ष बारामतीतील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजय या लढतीकडे आहे. दोन्ही उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी येथील मारुती मंदिरातून करण्यात आला. यावेळी झालेल्या दोन्ही सभांतून शरद पवार आणि अजित पवार गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यावेळी आपल्या भाषणातून मंगलदास बांदल यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. या टीकेवरून रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.

मंगलदास बांदल म्हणाले, अजितदादा विकास करण्यासाठी महायुतीत सहभागी झाले आहे. यावर शरद पवार म्हणतात की मग गेल्या पंधरा वर्षांत काय केले. यशवंतराव चव्हाणांचे नाव घेणाऱ्यांना असे विधान करणे शोभत नाही. अजितदादांना सर्वात जास्त शरद पवारांनीच बदनाम केले. ते कधीही यशवंतराव चव्हाणांची उंची गाठू शकत नाहीत. त्यांना देवाने सदबुद्धी देवो, आणि सुप्रिया सुळेंचा अर्ज मागे घेवो, अशा शब्दांत बांदल यांनी पवारांवर घणाघात केला.

शरद पवारांनी अनेक नेत्यांवर वैयक्तिक टीका केलेली आहे. जनता दलाचे दादाराव जाधवराव यांना ते म्हतारा बैल म्हणाले. शिरूरचे सूर्यकांत पलांडेंच्या हातावर फोड आले होते. जुन्नरचे दिलीप ढमढेरे आमदार होते. त्यांचा पाय तुटला होता, त्यांना म्हणाले पाठिंबा द्यायचा असेल तर दोन्ही पायांनी द्या, दीड पायांनी देऊ नका. पवारांनी सर्वांना हिणवले, अशीही टीका बांदलांनी पवारांवर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Rohit Pawar
Vinod Patil : भुमरेंची उमेदवारी जाहीर होताच शिंदे - फडणवीसांसमोर नवा पेच; विनोद पाटील लढण्यावर ठाम

बांदला यांच्या या टीकेनंतर रोहित पवारांनी थेट अजित पवारांना ट्विटद्वारे खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, अजितदादा तुम्हाला राजकारणात ज्यांनी सेट केले, सर्व काही दिले त्या पवार साहेबांवर टीका करण्यासाठी तुम्ही चिटर, खंडणीखोर, धमकी देणारा आणि जेलवारी करुन आलेल्या गुंड ‘अ’मंगलदास बांदल याची मदत घेता. तो टीका करताना स्वतः मान खाली घालून शांत बसता. हाच का तुमचा स्वाभिमान? साहेबांवर टीका करण्यासाठी भाडोत्री लोकांचा वापर करण्याचे तुमचे हे राजकारण कुणालाच पटणारे नाही. तुमच्यात झालेला हा बदल समजण्यापलीकडचा आहे, असेही रोहित पवार शेवटी म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar, Rohit Pawar
Jayant Patil News : महायुतीतील डझनभर नेते शरद पवार गटात येणार; जयंत पाटलांशी काय झाला करार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com