राज्यपाल कोशियारींनी घेतले माउलींचे दर्शन : समाधीस्थळी केली ही प्रार्थना!

माउलींचे दर्शन घेतल्यानंतर भगतसिंह कोशियारी यांनी देवस्थानच्या नोंदवहीत आपला अभिप्रायही नोंदविला
Bhagat Singh Koshiyari
Bhagat Singh KoshiyariSarkarnama
Published on
Updated on

आळंदी (जि. पुणे) : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या (Saint Dnyaneshwar Maharaj) संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्तिकी वारीत माऊलींच्या समाधीचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी (Bhagat Singh Koshiyari) यांनी आज (ता. २९ नोव्हेंबर) सायंकाळी दर्शन घेतले. या वेळी आळंदी देवस्थान समितीच्या वतीने राज्यपाल कोशियारी यांना ज्ञानेश्वरी, ज्ञानदेवांची मूर्ती भेट देण्यात आली. (Governor Bhagat Singh Koshiyari took darshan Saint Dnyaneshwar Maharaj)

आळंदीत सध्या माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्याच्या निमित्ताने कार्तिकी वारी सुरू आहे. या कार्तिकी वारीचे निमित्ताने राज्यपाल कोशियारी हे सोमवारी ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आळंदीत आले होते. राज्यपालांनी माऊलींचे दर्शन घेताना आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, ॲड. विकास ढगे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलिस उपायुक्त प्रेरणा कट्टे, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Bhagat Singh Koshiyari
शिवसेनेला धक्का : भाजपत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयास स्थगिती

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीदिन सोहळ्याच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल कोशियारी यांनी विधीवत माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले.

Bhagat Singh Koshiyari
खबरदार, गावात बालविवाह झाल्यास सरपंचपद जाणार!

माउलींचे दर्शन घेतल्यानंतर भगतसिंह कोशियारी यांनी देवस्थानच्या नोंदवहीत आपला अभिप्रायही नोंदविला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, पूज्य ज्ञानेश्वर महाराज माऊली समाधीस्थळाच्या दर्शनाचा लाभ झाला. माऊलींनी चराचरातील लहानमोठ्या जिवांबाबत आईचे ममत्व दाखवले. त्यामुळे त्यांनी केलेला उपदेश समाजाला आजही प्रेरक आहे. माऊलींना प्रार्थना करतो की आपले कृपाछत्र केवळ भारतातील नव्हे तर संपूर्ण विश्वातील प्राणीमात्रावर असावे. जेणेकरून या विचारांवर भागवतधर्म सन्मानाने चालत राहिला पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com