Gram Panchayat Election Results : हर्षवर्धन पाटलांनी गड राखला; राष्ट्रवादीचे डाव उलथवत बावड्याची सत्ता राखली

Indapur Gram Panchayat Results : सरपंचपदाच्या उमेदवार पल्लवी रणजीत गिरमे या १४३२ मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
Indapur Gram Panchayat Results
Indapur Gram Panchayat ResultsSarkarnama
Published on
Updated on

Indapur Election News : राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) संपूर्ण ताकद लावूनही इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीवर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली सत्ता राखली आहे. पाटील गटाने सरपंचपदासह ग्रामपंचायतीच्या १२ जागा जिंकल्या आहेत. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. (Gram Panchayat Results : Harshvardhan Patil's power in Bawda Gram Panchayat continues)

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे बावडा हे गाव. स्थापनेपासून ग्रामपंचायतीवर पाटील यांची सत्ता कायम आहे. या वेळी मात्र राज्यात सत्तेत असलेल्या मित्रपक्षाबरोबरच पाटील गटाची लढत होती.

मात्र, ग्रामपंचायती निवडणुकीत जवळचे लोक सोडून गेले होते. तसेच, नातेवाइकांनीही अगोदरच साथ सोडली होती, त्यामुळे बावडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काय होते, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Indapur Gram Panchayat Results
Gram Panchayat Results : शहाजीबापूंनी गावची सत्ता राखली; पण तीन ग्रामपंचायतींवर शेकापचा झेंडा

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाटील विरोधकांना ताकद दिली होती. सत्तेत असल्यामुळे ती ऊर्जा राष्ट्रवादीच्या गटाकडे होती. मात्र, विरोधकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत हर्षवर्धन पाटील यांनी बावडा ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखले आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळेश्वर ग्रामविकास पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता, तर माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेटफळ तलाव समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पद्यमावती ग्रामविकास पॅनेलने टक्कर दिली.

मात्र, चुरशीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे १७ पैकी १२ उमेदवार निवडून आले, तर भरणे गटाच्या पॅनेलचे १७ पैकी पाच सदस्य निवडून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पॅनेलला यश आले.

Indapur Gram Panchayat Results
Gram Panchayat Results : सहकारमंत्र्यांना मोठा धक्का; वळसे पाटलांच्या गावात शिंदे गटाचा सरपंच विजयी

सरपंचपदाच्या उमेदवार पल्लवी रणजीत गिरमे या १४३२ मताधिक्याने विजयी झाल्या आहेत, त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या गावात वर्चस्व कायम राखले आहे. इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. एक ग्रामपंचायत स्थानिक आघाडीकडे, तर बावडा ही ग्रामपंचायत हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात गेली आहे.

Indapur Gram Panchayat Results
Gram Panchayat Result : सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटलांना धक्का; तीन ग्रामपंचायतींमध्ये पराभव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com