Gram Panchayat Results : शहाजीबापूंनी गावची सत्ता राखली; पण तीन ग्रामपंचायतींवर शेकापचा झेंडा

Sangola Gram Panchayat Election Results : आमदार शहाजी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांची ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये युती असणे अपेक्षित होते. मात्र,
Sangola Gram Panchayat Election Results
Sangola Gram Panchayat Election ResultsSarkarnama
Published on
Updated on

Sangola News : आमदार शहाजी पाटील यांनी स्वतःचे गाव असलेल्या चिकमहूद ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. ग्रामपंचायतीच्या १५ पैकी १४ जागा आमदार पाटील यांच्या पॅनेलने जिंकल्या आहेत. गावची ग्रामपंचायत राखली असली तरी तालुक्यातील इतर तीन ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे शेकापची गेली काही वर्षांपासून सुरू असलेली विजय घेडदौड कायम आहे. (Gram Panchayat Election Results : Shahaji Patil retained power in his own village; But flag of PWP on three Gram Panchayats)

सांगोला तालुक्यामध्ये चिकमहूद, खवासपूर, वाढेगाव आणि सावे या चार ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. ५ नोव्हेंबर) चुरशीने ८३.३७ टक्के मतदान झाले होते. चिकमहूद ग्रामपंचायत ही आमदार शहाजी पाटील यांचे गाव आहे. संपूर्ण जिल्ह्याचे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीवर पाटील यांनी सत्ता राखली असली तरी महूद ग्रामपंचायत सोडली तर इतर तीन ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने आपली सत्ता खेचून आणली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sangola Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Results : सहकारमंत्र्यांना मोठा धक्का; वळसे पाटलांच्या गावात शिंदे गटाचा सरपंच विजयी

महूद ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५ जागांपैकी निवडणुकीच्या दरम्यान एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे १४ जागांसाठी मतदान झाले होते. या १४ पैकी १३ जागा आमदार शहाजी पाटील यांच्या गटाने जिंकल्या आहेत, तर एक जागा विरोधकांना मिळविण्यात यश आले आहे. सरपंचपदही शहाजी पाटील गटाने जिंकले आहे.

वाढेगाव ग्रामपंचायतीवर माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची सत्ता होती. या ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्षाने बाजी मारली असून, सरपंचपदासह १३ जागांपैकी सात जागा जिंकल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीची ग्रामपंचायत शेकापने स्वतःकडे खेचून आणली आहे. या ठिकाणी पाटील गटाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

सावे ग्रामपंचायत ही पारंपरिक शेकापचा गड मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. ती या वेळीही त्यांनी टिकवली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या दोन गटांतच या वेळी लढत झाली होती. असे असूनही सावे ग्रामपंचायतीमध्ये शेकापने बाजी मारली आहे.

Sangola Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Result : सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटलांना धक्का; तीन ग्रामपंचायतींमध्ये पराभव

खवासपूर ग्रामपंचायत मागील दोन पंचवार्षिकपासून आमदार पाटील गटाकडे होती. या निवडणुकीत मात्र शेकापने सरपंचपदासह १०-१ अशी सत्ता मिळविली आहे. खवासपूर ग्रामपंचायत ही आमदार शहाजी पाटील यांच्या चिकमहूद या पंचायत समिती गणामध्ये येते. त्या ठिकाणी पाटील गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या विजयी उमेदवारांचे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख अभिनंदन केले. विजय शांततेत साजरा करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले.

सांगोला तालुक्यातील सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार आमदार शहाजी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांची ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये युती असणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षेपुढे या दोन्ही नेत्यांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली. नेमका त्याचा फटका खवासपूर आणि वाढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे.

Sangola Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election Results : एकच वादा अजितदादा! राज्यात अजित पवार गटाचा डंका; इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना धक्का

खवासपूर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला, तर वाढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका गटाने शेतकरी कामगार पक्षाबरोबर तर दुसऱ्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती केली होती. खवासपूर आणि वाढेगाव या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शहाजी पाटील आणि दीपक साळुंखे यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडल्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.

खवासपूर ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेला, तर वाढेगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे. या दोन्ही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत.

Sangola Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election Results : आबांच्या पोरानं मैदान मारलं ! सचिन पाटलांनी उडवला धुव्वा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com