Pune News: "'मविआ' सरकार घालवण्यासाठी घरी बसायलाही तयार होतो; पण पक्षाने मला सन्मानित करून उपमुख्यमंत्री केलं"

Devendra Fadnavis on Mahavikas Aghadi: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Pune News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. "महाविकास आघाडीचं सरकार घालवण्यासाठी घरी बसावं लागलं असतं तरी मी तयार होतो. पण मला पक्षाने सन्मानित करून उपमुख्यमंत्री पदावर नियुक्त केलं", असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारवरही देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली.

फडणवीस म्हणाले, "आपला देश आज वेगाने प्रगती करत आहे. गरीब कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या घरी पाणी, वीज गेली पाहिजे. बेघरांना घर मिळालं पाहिजे. बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी आज मोठ्या प्रमाणात विकासाचे काम सुरू आहे. त्यामुळे या माध्यमातून रोजगार मिळत आहे. गरिबांच्या खिशात दोन पैसे जात आहेत. या माध्यमातून देशाच्या अर्थ व्यवस्थेला चालना मिळत आहे", असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Raj Thackeray : महिन्याभरात रिझल्ट न दिल्यास घरी पाठवणार; गटबाजी करणाऱ्यांना 'राजादेश'...

"जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पुन्हाआपलं सरकार आलं. खरं म्हणजे 2019 ला जनतेने आपल्यालाच निवडून दिलं होतं. त्यावेळी आपण युतीमध्ये लढलो. जनतेने युतीला 170 जागा दिल्या. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने खुर्चीसाठी विचार सोडला. त्यांना खुर्चीचा एवढा मोह झाला होता की विचार सोडून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जावून मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात अभद्र असं महावसूली सरकार आलं ", अशी टीका त्यांनी केलं.

"महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्ष आम्ही संघर्ष केला. त्या सरकारमध्ये दोन मंत्री जेलमध्ये गेले. गृहमंत्री जेलमध्ये गेले, सरकारच्या अनेक मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आरोप झाले. कोरोना काळात तर अनेक भष्ट्राचार झाले. त्यामुळे अशा प्रकराचं सरकार घालवणं गरजेचं होतं. जे आपल्यासोबत युतीमध्ये निवडून आले होते, जे खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे पाईक होते, ते एकनाथ शिंदे आपल्यासोबत आले. खरी शिवसेना आपल्यासोबत आली आणि आपलं सरकार राज्यात तयार झालं", असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Parner News: निलेश लंकेंची विजय औटींना पुन्हा धोबीपछाड; पारनेर बाजार समितीची दोन्ही पदे राष्ट्रवादीच्या पारड्यात

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, "जगदीशजी (जगदीश मुळीक) आपल्याला कुठलं पद मिळतं हे महत्वाचं नसतं. आपला विचार हा महत्वाचा असतो. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये भगव्याचा विचार हा पायाखाली चिरडण्याचं काम चाललं होतं".

"सामान्य मानसाला प्रतारीत केलं जात होतं, त्यामुळे अशा सरकारला घालवणं हे महत्वाचं होतं. हे सरकार घाणवण्याकरता मला घरी जरी बसावं लागलं असतं तरी मी तयार होतो, पण मला तर आपल्या पक्षाने सन्मानित करून उपमुख्यमंत्री पदावर बसवलं आणि हे सरकार एकनाथ शिंदे यांच्यासोबत चालवण्याची संधी दिली'', असं ते यावेळी म्हणाले.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com