Pune Loksabha : पुणे हे वाढते शहर असून अतिशय वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे मी वारंवार 'पुण्यावर माझं विशेष प्रेम' आहे असे बोलत आलेलो आहे. मी असे म्हणले की, दुसऱ्या दिवशी मी पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे, अशा बातम्या येतात. त्यामुळे मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे या ठिकाणी स्पष्ट करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सोमवारी पुणे (Pune) दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे लोकसभा (Pune Loksabha) उमेदवारीबाबत स्पष्टच सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून विविध रंजक गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत.
सध्या भाजपकडून (BJP) पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असणार याबाबत विविध अंदाज लावण्यात येत आहेत. यामध्ये स्थानिक नावे आघाडीवर आहेतच परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे देखील संभाव्य उमेदवार असू शकतात, अशाच चर्चा काही दिवसांपासून पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघ हा अलीकडच्या कालावधीमध्ये खासदारकीसाठी सर्वाधिक 'सेफ' मतदारसंघ असल्याचे भाजप नेत्यांना वाटू लागला आहे. त्यामुळे भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळाली म्हणजे आपण हमखास खासदार होणार असल्याची गॅरंटी सध्या इच्छुकांना वाटते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या उमेदवारीच्या स्पर्धेत माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे हे स्थानिक नेते असल्याची चर्चा आहे. असे असले तरी राष्ट्रीय पातळीवरती आणि राज्य पातळीवरती काम करणारे नेते देखील पुणे लोकसभा निवडणूक लढू शकतात, असा कयास आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सुनील देवधर.
सुनील देवधर हे भाजपाचे ईशान्यमधील एक मोठे नाव आहे. ईशान्य भारतात भाजपाला उभारी देण्यात आणि सत्तेपर्यंत घेऊन जाण्यात सुनील देवधर यांचा मोठा हात असल्याचे बोलले जाते. पुणे लोकसभेची उमेदवारी पक्षाने आपल्याला दिल्यास आपण ही निवडणूक लढण्यास तयार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीला शह देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या मैदानात उतरू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. तसे झाल्यास मोदी हे पुण्यातून निवडणूक लढवतील, अशा चर्चा आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे देखील पुण्याच्या मैदानातून लोकसभेमध्ये एन्ट्री करू शकतात, अशा बातम्या या आधी आल्या होत्या. याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा केला आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.