BJP News : मुख्यमंत्री देणार समर्थक आमदारांना लवकरच मंत्रिपदाचे ‘गिफ्ट’!

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याशी रणनीतींवर चर्चा झाली.
BJP
BJPSarkarnama

बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) तयारी सुरू असतानाच पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) होणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकापूर्वी राज्यातील नाराज समुदायाला खूश करण्याचा राज्यातील सरकारचा प्रयत्न आहे. (Discussion of cabinet expansion ahead of assembly elections in Karnataka)

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याशी रणनीतींवर चर्चा झाली. बोम्मई यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी त्यांचा पाठिंबा मागितला होता. या आठवड्यात बेळगाव सीमावादावर चर्चा करण्यासाठी बोम्मई हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला जातील. जेव्हा ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दाही उपस्थित करतील, असे सूत्रांनी सांगितले.

BJP
BJP News : भाजपला मोठा हादरा : खाणसम्राट रेड्डींकडून नव्या पक्षाची घोषणा; मतविभागणीचा फटका बसणार

सध्या मंत्रिमंडळात सहा रिक्त जागा आहेत. त्या सर्व भरण्यासाठी मुख्यमंत्री उत्सुक आहेत. मुख्यमंत्री आणि पक्ष हे काही मंत्र्यांना वगळण्यासाठी आणि नवीन चेहऱ्यांना सामावून घेण्यास उत्सुक आहेत. लंबाणी समाजातील पी. राजीव, गोल्ला समाजातील के. पौर्णिमा आणि कोळी समाजातील बाबूराव चिंचनसूर हे या शर्यतीत आहेत, असे सांगितले.

BJP
मोठी बातमी : शिवसेनेला भाजपचा पाठिंबा; शिंदे गटाच्या सामंतांविरोधात एकत्र!

याशिवाय कुरुबा समाजातील के. एस. ईश्‍वराप्पा आणि वाल्मिकी समाजातील रमेश जारकीहोळी या माजी मंत्र्यांना पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी आहे. वक्कलिग आणि रामनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या चन्नपटण तालुक्यातील आणखी एक मातब्बर नेते, माजी मंत्री सी. पी. योगेश्वर हेही रिंगणात आहेत. येथूनच धजद नेते एच. डी. कुमारस्वामी २०२३ मध्ये पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये या जागेवर योगेश्वर हे कुमारस्वामी यांच्याकडून पराभूत झाले.

BJP
Konkan News : राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी ठाकरे-शिंदे गटाचा हातात हात

बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये सामील झालेल्या चामराजनगर जिल्ह्यातील कोळ्ळेगल येथील प्रमुख दलित चेहरा एन. महेश यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत पक्ष विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. इतर इच्छुकांमध्ये जी. एच. तिप्पारेड्डी, दत्तात्रेय पाटील-रेवूर, अरविंद बेल्लद यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com