Pune NCP News: योगेश ससाणेंनी दोन पत्त्यांचा गेम खेळला ; हातात दहा हुकमी एक्के ठेवले ; राष्ट्रवादीलाच ‘कन्फ्यूज’ केले...

Pune Political News: ससाणेंच्या मनात काय आहे ?
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune NCP News: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार आणि बंड पुकारून उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांकडूच्या प्रमुख नेत्यांमध्ये ‘धुमश्‍चक्री’ सुरू आहे. दोन्ही गटाचे बडे नेते सभांमधून आरोप-प्रत्यारोपांचा दारूगोळा फेकत आहेत. अशातच पवारसाहेबांना साथ देणारे पुण्यातील आमदार चेतन तुपेंनी सोमवारी सकाळी अचानकच अजितदादांच्या व्यासपीठावर जाऊन साऱ्यांना बुचकळ्यात टाकले. त्यापलीकडे जाऊन याच भागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक योगेश ससाणेंनीही पवारसाहेब, अजितदादांच्या गोटातील नेत्यांचे फोटो लावून, त्यांना निमंत्रण धाडून या मंडळींना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्लॅन केला. यानिमित्ताने दोन्ही गटांना चुचकारणाऱ्या ससाणेंनी स्व:पक्षात दोन पत्त्यांचा गेम खेळला आणि दोन्ही गटातील दहा हुकमी एक्के (नेते) हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. ससाणेंच्या या ‘डावा’मुळे अख्खी राष्ट्रवादीच ‘कन्फ्यूज’ झाली, हेही नक्की.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बंडखोरीनंतर या पक्षात वर्चस्वावरून जोरदार संघर्ष होऊ लागला आहे. आपली ताकद दाखविण्यासाठी बीडमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी थेट पवारांना सवाल विचारले. त्यावरून मूळ राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. या साऱ्या गोंधळात योगेश सासणेंनी एका निमंत्रण पत्रिकेवर पक्षाध्यक्ष शरद पवारांपासून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांचेही फोटो लावले आहेत.

Ajit Pawar
Udayanraje Bhosale Poetry: “आमच्या मनात आहेत, आठवले…म्हणूनच आम्ही त्यांना गटवले..; उदयनराजेंनी घेतली आठवलेंची फिरकी..

पवारसाहेबांना पाठिंबा दिलेले तुपे, बंडापासून अजितदादांकडे राहिलेले आमदार सुनील टिंगरेंचाही फोटो या पत्रिकेवर लावला आहे. या कार्यक्रमाला अजितदादांना बोलावून ससाणेंनी प्रभागातील राष्ट्रध्वजाच्या खांबाचा लोकार्पण सोहळा उरकला. स्थानिक पातळीवर म्हणजे, खासदार चव्हाण, जगतापांचा फोटो असला; तरी या दोघेही कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. तरीही, एकाच पक्षातील जुन्या-नव्या गटातील नेत्यांना मान दिल्याने ससाणेंच्या मनात काय आहे, याची उलटसुलट चर्चा होत आहे. परंतू, राष्ट्रवादतील बेभरवशाच्या घडामोडींवर उतारा म्हणून ससाणेंनी अशा प्रकारची खेळी खेळल्याचेही बोलले जात आहे.

Ajit Pawar
Gulabrao Patil News: मला नशिबानं हे खातं मिळालं..., सगळ्यांना 'पाणी' पाजतो ; गुलाबरावांची मिश्किल टिपण्णी

दोन्ही डगरीवर हात

पुण्यात पवारसाहेब आणि अजितदादांना मानणारे बहुतांशी माजी नगरसेवक, पदाधिकारी अजूनही तळ्यात-मळ्यात आहेत. ना पवारसाहेबांकडे उघडपणे जात आहे, ना अजितदादांना समर्थन देण्याचे धाडस कोणी दाखवत आहेत. त्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादीत नेमके काय चालले आहे, याची चर्चा राज्यभर सुरू आहे. हडपसरमधील राष्ट्रवादीतील अनेक माजी नगरसेवकांनीही बघ्याची भूमिका घेत, आपले पत्ते उघड करण्यास तयारी नसल्याचे दिसत आहे. त्यात आधी तुपेंच्या पवित्र्याकडे डोळे लावून बसलेल्या ससाणेंनी काही दिवस ‘सबुरी’ दाखवली. मात्र, तुपेंचा अंदाज येत नसल्याने ससाणेंनी शेवटी राष्ट्रवादीतील दोन्ही डगरीवर हात ठेवला आणि ‘सेफ’ राहण्याचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट आहे.

Ajit Pawar
Thackeray Group On Ajit Pawar: सत्तेची हाव नाही, मग काकांचा पक्ष का फोडला? अजितदादांच्या विकासाची व्याख्या म्हणजे...

ससाणेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला लगाम

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ससाणे हे पहिल्यांदाच हडपसरमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. आतापर्यंत त्यांनी पवारसाहेबांच्या धोरणांना पाठिंबा दाखवला. मात्र, अजितदादांच्या दुसऱ्या बंडापासून ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतलेल्या ससाणेंनी पक्षातील दोन्ही गटातील नेते आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले. मात्र, ससाणेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला लगाम घालण्याची एकही संधी न सोडणाऱ्या तुपे व्यासपीठावर अजितदादांच्या शेजारी बसले. त्यातूनही पक्षात काहीही झाले; तरीही ‘मी, मीच आहे’, हेही ससाणेंना दाखवून देण्यात तुपे सरस ठरले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com