Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटलांची मोठी खंत; म्हणाले, महायुती असो की महाविकास आघाडी आम्हीच...

Political News : इंदापूर मतदारसंघात कोण निवडणूक लढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच आम्ही आघाडीत असो किंवा महायुतीत असलो तरी आम्हाला टार्गेट केले जातेय, असे म्हणत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी खदखद व्यक्त केली.
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विविध राजकीय पक्ष विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत असतानाचे चित्र आहे. इंदापूर मतदारसंघात कोण निवडणूक लढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच आम्ही आघाडीत असो किंवा महायुतीत असलो तरी आम्हाला टार्गेट केले जातेय, असे म्हणत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी खदखद व्यक्त केली.

महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाकडे आहे. त्याठिकाणी माजी मंत्री दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) यांच्या हक्काची जागा कुणाला सुटणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

त्यातच आता निवडणुका जवळ आल्याने मला जाणीवपूर्वक एकटाही पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही आघडीत असो किंवा महायुतीत असलो तरी आम्हाला टार्गेट केले जात आहे. हर्षवर्धन पाटील हे राजकारणाच्या क्षितिजावर नको अशी काही जणांची भूमिका असल्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

आम्ही दादागिरी करीत नाही. कोणाबद्दल अपशब्द वापरत नाही, त्रास कधी कुणाला त्रास दिला नाही. लोकसभा निवडणुकीला आम्ही संघर्ष असताना देखील आम्ही काम केले. आता वेळ आली की मला एकट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा वास आम्हाला येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Harshvardhan Patil
Jayant Patil News : 'मी त्यांना कधीही भेटलो नाही,माझा त्यांच्याशी काहीच संबंध नाही'; सचिन वाझे प्रकरणात जयंत पाटलांनी झटकले हात

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी बॅनरबाजी केली आहे. 1995, 1999 आणि 2004 या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि त्या जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 2019 प्रमाणे इंदापूरची जागा सोडणार नाहीत. हर्षवर्धन पाटलांना पुन्हा एकदा दगा देतील, हे ओळखूनच हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता येत्या काळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असला तरी महायुतीच्या जागावाटपात ही जागा कोणाला सुटणार यावर सर्व काही अवलंबुन असणार आहे.

Harshvardhan Patil
Nilesh Rane News : ... तर थोबाड फुटायला वेळ लागणार नाही; अमोल मिटकरींवर निलेश राणेंचा थेट प्रहार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com