Nilesh Rane News : ... तर थोबाड फुटायला वेळ लागणार नाही; अमोल मिटकरींवर निलेश राणेंचा थेट प्रहार

MNS Vs Amol Mitkari News : मनसे व मिटकरी समर्थक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वातावरण चांगलेच चिघळले आहे. त्यानंतर मिटकरी यांच्यावर निलेश राणेंनी थेट प्रहार केला आहे.
Raj Thackeray, Amol Kolhe, Nilesh Rane
Raj Thackeray, Amol Kolhe, Nilesh Rane Sarakrnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर अकोल्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. त्यात त्यांच्या कारचे नुकसान झाले होते. या हल्ल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मिटकरींना धमक्याही दिल्या होत्या. त्यातच हल्ला करणाऱ्या मनसेच्या एका कार्यकर्त्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

या प्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांतील काही आरोपीला अटक केली आहे. यावरून मनसे व मिटकरी समर्थक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वातावरण चांगलेच चिघळले आहे. त्यानंतर मिटकरी यांच्यावर निलेश राणेंनी (Nilesh Rane) थेट प्रहार केला आहे. राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टीका करू नका अन्यथा थोबाड फुटायला वेळ लागणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात या वक्तव्यावरून महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (Nilesh Rane News)

अकोल्यात ज्या विधानामुळे हल्ला झाला, त्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ठाम असल्याचे स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावर आपण 202 टक्के ठाम आहे.

मनसेतील नेते हे सुपारीबाज, दारू पिणारे, पळ काढणारे असल्याचा पुनरुच्चार मिटकरींनी केला. त्यामुळे मिटकरी-मनसेतील वाद चिघळण्याची शक्यता असतानाच या वादात आता भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतली असून त्यांनी मिटकरींवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

राज ठाकरे यांच्यावर कोण खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असेल तर ते आम्हालाही सहन होत नाही, राज ठाकरे कुठे आणि आपण कुठे याचा भान टीका करणाऱ्यांनी ठेवले पाहिजे. टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं अजून फक्त गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. थोबाड फुटायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात माजी खासदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.

Raj Thackeray, Amol Kolhe, Nilesh Rane
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंकडून अमित शाह यांच्या टीकेची परतफेड ; म्हणाले, 'अब्दालीचे राजकीय वंशज'

दरम्यान, अमोल कोल्हेवरील या हल्ल्याप्रकरणी अकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे नेते कर्णबाळा दूनबळे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर 7 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. यावर मिटकरी म्हणाले, कर्णबाळा दूनबळे यांना पोलिस अटक करतील, अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी अटक न केल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Raj Thackeray, Amol Kolhe, Nilesh Rane
Uddha Thackeray : मोदींना आव्हान, फडणवीसांना इशारा अन् शिवसैनिकांना आदेश; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com