Mumbai News : राज्याचे गृहमंत्री असताना अनिल देशमुख आपल्या स्वीय सहायकांमार्फत पैसे गोळा करीत होते, असा आरोप सचिन वाझे याने करून खळबळ उडवून दिली. शनिवारी सकाळपासून वाझेच्या पत्रावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
माजी गृहमंत्री देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सांगण्यावरून वाझे बोलत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे सचिन वाझे मला कधीही भेटलेले नसल्याचे सांगत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हात झटकले आहेत. त्यासोबतच वाझेंने केलेले सर्व आरोप जयंत पाटलांनी फेटाळले आहेत. ( Jayant Patil News)
सचिन वाझे मला कधीही भेटलेले नाहीत. माझा त्यांचा कधी काहीच संबंध नाही. मी बाईट बघितला आहे. ANI चा माणूस त्यांना खोदून खोदून विचारत आहे. तुरुंगात असणारे लोक आता बाईट देत आहेत. त्यांनी तुरुंगातून पत्र पाठवले आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचे तुरुंगातील लोकांशी संपर्क आहेत. मी असं मानतो की, गृहमंत्री माझे हितचिंतक आहेत. तसे काही असेल तर ते मला कळवतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केले.
सचिन वाझे यांच्या आरोपानंतर बोलताना जयंत पाटील म्हणाले, रात्री झालेला बाईट दिवसभर कसा चालवला जातो. त्याला प्रसिद्धी कशी मिळेल. यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. समोरच्या लोकांकडून आता सगळे प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्यांचा वापर केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
हे सगळ ठरवून केले जात आहे. शंभर टक्के जुळवून आला आहे. तेच प्रश्न कसे विचारले जातात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांनी सचिन वाझेला प्रवक्ते पद दिल्यानंतर त्या पक्षाची यापेक्षा वाईट अवस्था होईल, असेही यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.
भाजपच्या केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या केवळ त्यांच्या कामासाठी मला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत काही विषय नसल्याचे सांगत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना फेटाळून लावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.