आरोग्यमंत्री सावंतांनी घेतली आमदार गोरेंची रुग्णालयात जाऊन भेट; प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची माहिती

Jayakumar Gore News : पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठणजवळ शनिवारी (२४ डिसेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला.
Jayakumar Gore, Tanaji Sawant
Jayakumar Gore, Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Jayakumar Gore : पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठणजवळ शनिवारी (२४ डिसेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला. यानंतर आता गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी स्वतः रुबी रुग्णालयात जाऊन गोरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत गोरे यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

सावंत म्हणाले, 'अधिवेशन संपल्यावर आम्ही सर्वजण पुण्यात आलो. त्यानंतर आमदार गोरे रात्री पुण्याहून (PUNE) फलटणला जात होते. फलटणजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे गाडी पुलाचे कठडे तोडून जवळपास ६० फूट खाली कोसळली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ताबोडतोब येऊन मदत केली.”

Jayakumar Gore, Tanaji Sawant
Mumbai Police News : पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या टि्वटनं खळबळ ; डीजीपीकडे मदतीची याचना

सध्या गोरे यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही डॉक्टरांना सूचना दिल्या आहे. गोरे यांच्यासह इतरांचीही तब्येत व्यवस्थित आहे. गोरे यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, त्यांच्यावरील धोका टळलेला आहे, असे सावंत यांनी सांगितले.

Jayakumar Gore, Tanaji Sawant
Jayakumar Gore : मोठी बातमी ; आमदार जयकुमार गोरे अपघातात जखमी

अपघात झाल्यानंतर गोरेंच्या गाडीच्या एअर बॅग्ज उघडल्या नाही, अशीही चर्चा आहे. याबाबत सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, गाडीबाबत मी माहिती घेतली नाही. मी केवळ गोरे यांच्या आरोग्याविषयी बोलेल. मी गोरेंशी चर्चा केली. ते स्वतः माझ्याशी बोलले. अगदी स्पष्ट सांगायचे तर गोरे यांच्या पत्नीने सांगितले की, ते चर्चा करताना आज हसलेदेखील, असेही सावंत यांनी सांगितले. त्यांची तब्येत चांगली आहे. पुढील पाच ते सहा दिवसात ते आयसीयूतून बाहेर येतील, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com