

आरोग्य भरती घोटाळा
सरकारनामा
पुणे, ता. १३ : आरोग्य विभागाच्या (Health Department) पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेला नेव्हल डॉकयार्डमधील (Navy) खलाशी प्रकाश मिसाळ हा टीईटी, पोलीस भरतीसह इतर परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवणाऱ्या एजंटच्या संपर्कात होता. त्याने आरोग्य विभाग गट ‘ड’च्या पेपर व्यतिरिक्त अन्य कोणकोणत्या परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवून ते परीक्षार्थींना वाटले याचा पोलीस (Police) तपास करीत आहेत.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोग्य विभागातील सहसंचालक महेश सत्यवान बोटले (वय ५३, रा. मुंबर्इ) यांच्यासह शिक्षक नामदेव विक्रम करांडे (वय ३३, रा. बीड), उमेश वसंत मोहिते (वय २४, रा. उस्मानाबाद) आणि प्रकाश दिगंबर मिसाळ (वय ४०, रा. मावळ) यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी (ता. १३) संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोलिसांनी न्यायालयास या तपासाच्या गुन्ह्याची माहिती दिली. या गुन्ह्यातील एजंट बुढे आणि जायभाय अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी मिसाळ याच्याकडे चौकशी करायची आहे. बोटले यांच्या विभागातील पेपर सेट करणाऱ्या समितीतील इतर सदस्य लाभार्थी आहेत का ? याचा तपास त्यांच्याकडे करायचा आहे. करांडे आणि मोहिते यांनी लाखो रुपये देवून लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय ५०, रा. लातूर) यांच्या चालकाकडून फुटलेला पेपर मिळवला, असे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयास सांगितले. याबाबत तपास करण्यासाठी चारही आरोपीच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांची वाढ करण्याची मागणी ॲड. जाधव यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत १८ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.
बोटले यांनी गट क आणि ड चा पेपर असलेला पेनड्राईव्ह एका लिफाफ्यामध्ये ठेवला. तो लिफाफा त्यांनी त्याचा शिपाई संजय खापरे याच्या मदतीने बडगिरे याचा चालक बाबू राऊत यांच्याकडे देण्यासाठी दिला होता.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.