Rapido Bike Taxi : बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या 'रॅपिडो'ला हायकोर्टाचा दणका; सेवा बंद करण्याचे आदेश

Rapido Bike Taxi : २० जानेवारीपर्यंत बाईक टॅक्सीला स्थगिती
Pune Rapido Bike Taxi
Pune Rapido Bike Taxi Sarkarnama

Pune Rapido Bike Taxi : पुण्यात बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या 'रॅपिडो'ला हायकोर्टाने दणका दिला आहे. आता बाईक टॅक्सीची सेवा पुरवणाऱ्या कंपनीला राज्यभरातील सरसकट बाईक टॅक्सीची सेवा २० जानेवारीपर्यंत बंद करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. या आदेशानंतर २० जानेवारीपर्यंत सर्व सेवा बंद ठेवण्याचे रॅपिडोने मान्य केले आहे.

हायकोर्टाने रॅपिडोला महाराष्ट्रातील सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या कंपनीकडे बाईक टॅक्सी चालविण्याचा कुठलाही परवाना नाही आणि ते बेकायदेशीरपणे चालवत होते, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यातील रिक्षा चालक आणि बाईक टॅक्सी यांच्यामध्ये वाद रंगला होता. रिक्षाचालकांकडून रॅपिडो सेवा बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांच्या या मागणीला काही प्रमाणात यश आलं आहे.

Pune Rapido Bike Taxi
Eknath Shinde News : वटहुकूम बदलण्याची मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ; कायदेशीर लढाईचा कार्यकर्त्याचा निर्धार

मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे रॅपिडोची सेवा काही दिवसासाठी बंद असणार आहे. आज शुक्रवारी दुपारी १ वाजल्यापासून ही सेवा बंद करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. तर आता यावरील पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे.

या आधी देखील नागरिकांनी प्रवासासाठी दुचाकी टॅक्सीचा उपयोग करु नये, अशा सूचना आरटीओकडून देण्यात आल्या होत्या. तर या रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचं पुण्यातील रिक्षाचालकांचं म्हणणं होतं.

Pune Rapido Bike Taxi
Balasaheb Thorat News: बाळासाहेब थोरातांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन : ‘सत्यजित तांबेंना उमेदवारी...’

नेमकी प्रकरण काय?

१६ मार्च २०२० ला रॅपिडोने पुणे आरटीओमध्ये लायसन्ससाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा हा अर्ज परिवहन विभागाने नाकारला होता. त्याचबरोबर रॅपिडोचे अॅप आणि त्याची सेवा वापरू नये, असे आवाहन देखील नागरिकांना केले होते.

मात्र, यानंतर रॅपिडोने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०२२ ला हायकोर्टाने संबधित विभागाला परवानगीचा पुनर्विचार करण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर देखील रॅपिडोला परवानगी देण्यास आरटीओने नकार दिला.

आज या सुनावणीवेळी 'बाईक टॅक्सी'बाबत स्वतंत्र समिती स्थापन केल्याचे राज्य सरकारने मुंबई (Mumbai) हायकोर्टाला सांगितले आहे. तसेच यासंदर्भातील समिती लवकरच अहवाल सादर करणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही सेवा त्वरित बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हायकोर्टाने (Bombay High Court) ही सेवा २० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com