Pimpri Chinchwad Crime News : हाय प्रोफाईल किशोर आवारे खूनाच्या बदल्याचा कट शिजला, पण पोलिसांनी वेळीच उधळला!

Pimpri Chinchwad Crime News : मावळातील आणखी एका राजकीय खूनाचा कट पोलिसांनी उधळला, १४ काडतूसे आणि चार पिस्तूलांसह दोघांची धरपकड
Pimpri Chinchwad Crime News :
Pimpri Chinchwad Crime News :Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे (KishorAware Death Case) यांचा यावर्षी १२ मे रोजी भरदिवसा नगरपरिषद कार्यालय आवारातच निघृण खून झाला होता. त्याचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना तळेगावातच पोलिसांनी पकडले असून, चार पिस्तूले आणि १४ जिवंत काडतूसे त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. (Latest Marathi News)

एक मोठा कट उधळून लावल्याचा दावा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (PCMC Police) या दोघा सशस्त्र गुंडांच्या धरपकडीनंतर आज केला. एक ठराविक उद्देश साध्य करण्यासाठी या जोडगोळीने मध्यप्रदेशातून हा शस्त्रसाठा आणला होता. पण, तो तडीस जाण्यापूर्वीच उधळून लावल्याचा दावा पिंपरी-चिंचवड शहर गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने आज केला.

Pimpri Chinchwad Crime News :
BRS offered CM Post To Raju Shetti : पंकजा मुंडेंनंतर 'बीआरएस'चा राजू शेट्टींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; शेट्टी म्हणाले...

प्रमोद सोपान सांडभोर (वय 33, रा. हरणेश्वरवाडी, तळेगाव दाभाडे), शरद मुरलीधर साळवी (वय 30, रा. धनगरबाबा मंदिरामागे काळेवाडी,पिंपरी) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांना १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी वडगाव मावळ न्यायालयाने दिली आहे. ते आवारे यांच्या निकटच्या वर्तुळातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या अंदाजानुसार हे दोघे आवारेंच्या खूनाचा बदला घेण्याच्या तयारीत होते. या कटामध्ये आणखी तीन जण सहभागी असल्याचे समजले आहे. आवारे खूनाचा गुन्हा दाखल असलेल्या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातच याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील सराईत गुन्हेगार सांडभोर व साळवी हे रविवारी तळेगाव दाभाडे बस स्टॅन्डजवळ शस्त्रासह येणार असून ते मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत, अशी खबर दरोडा विरोधी पथकातील पोलिस नाईक आशिष बनकर व पोलिस शिपाई सुमीत देवकर यांना मिळाली होती. त्यानुसार या पथकाचे पीआय जितेंद्र कदम, एपीआय अंबरीश देशमुख आदींनी त्या परिसरात सापळा लावला.आरोपी हे निळ्या रंगाच्या मोटारीतून खाली उतरले. त्यांच्या कंबरेला पिस्तूले होती. पोलिसांचा सुगावा लागताच ते दोघे वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले. मात्र,पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.

Pimpri Chinchwad Crime News :
Sharad Pawar Reply To Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या गंभीर आरोपावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, '' हीच गोष्ट त्यांना...''

यावेळी त्यांच्याकडे दोन पिस्तूले आणि 4 जिवंत काडतूसे सापडली. तर, मोटारीच्या झडतीत आणखी दोन पिस्तूले आणि 10 जिवंत काडतुसे मिळून आली. यासह मोटारही पोलिसांनी जप्त केली. सांडभोरविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न असे 8 तर, साळवीविरुद्ध खून मारामारी, बलात्कार असे तीन गुन्हे दाखल आहेत. सांडभोर हा तळेगाव येथे जमिन व्यवहाराचे काम करतो. तर,साळवी हा दोन महिन्यापूर्वीच खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दरोडाविरोधी पथकाच्या या कामगिरीबद्दल त्यांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस आज जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com