पिसर्वे गावचा ऐतिहासिक निर्णय : स्वातंत्र्यदिनी विधवा महिलेच्या हस्ते करणार ध्वजवंदन!

विधवा प्रथा मोडीत काढण्याचा ठराव ग्रामसभेत एकमुखाने मंजूर; महिलांची उपस्थिती लक्षणीय
Pisarve's Gramsabha
Pisarve's GramsabhaSarkarnama
Published on
Updated on

माळशिरस (जि. पुणे) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पुरंदर (Purandhar) तालुक्यातील पिसर्वे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी आज (ता. ८ ऑगस्ट) विशेष ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विधवा प्रथा मोडीत काढण्याचा व विधवा महिलांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी (Independence Day) ध्वजवंदन (Flag hoisting) करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे. पिसर्वे गावाच्या लौकिकाला साजेसा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याचे सरपंच बाळासाहेब कोलते यांनी ग्रामसभेनंतर बोलताना सांगितले. (Historical decision of Pisarve : Flag hoisting will be done by a widow on Independence Day)

पिसर्वे येथे आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेमध्ये परंपरेने चालत आलेली अनिष्ठ विधवा प्रथा मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या ग्रामसभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. ग्रामसभेत ‘आम्ही संवादी’ या संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी उपस्थित गावकाऱ्यांसह महिलांना ही प्रथा बंद करण्यामागची कारणे व गरज याबाबत मार्गदर्शन केले.

Pisarve's Gramsabha
विधान परिषदेत शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होणार; अंबादास दानवेंचे नाव निश्चित

विधवा प्रथा मोडीत काढण्याचा ठराव सरपंच बाळासाहेब कोलते यांनी मांडला. ग्रामपंचायात सदस्या योगिता कोलते यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गावकऱ्यांनी हात उंचावत विधवा प्रथा मोडण्याच्या ठरावाला संमती दिली. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर उपस्थित सर्व विधवा महिलांना गावातील ज्येष्ठ नेते श्रीरंग वायकर व ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू, बांगड्या आणि साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले.

Pisarve's Gramsabha
मंत्रिपदासाठी भाजपची चार नावे निश्चित; चंद्रकांतदादा, विखे पाटील, मुनगंटीवार, महाजनांचा समावेश

या वेळी सरपंच बाळासाहेब कोलते, उपसरपंच मीना कोलते, माजी उपसरपंच अरुणा कोलते, सदस्य रवींद्र कोलते, महेश वाघमारे, चंद्रकांत कोलते, सुनील कोलते, सदस्या योगिता कोलते, कविता कोलते, सुषमा कटके, शीतल कोलते यांच्यासह ग्रामसेवक अमित टिळेकर आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Pisarve's Gramsabha
मोठी बातमी : शिंदे गटाचे सामंत, भुसे, भुमरे, सत्तार, देसाई होणार मंत्री; भाजपकडून लोढांना संधी

‘सुवर्णाक्षरांनी लिहावा असा निर्णय’

पिसर्वे ग्रामपंचायतीने आज सुवर्णाक्षरांनी लिहावा असा निर्णय घेतला आहे. रूढी परंपरेने चालत आलेली विधवा प्रथा आज आम्ही मोडीत काढली आहे. याचा एक महिला म्हणून मला अभिमान वाटतो, असे पिसर्वे ग्रामपंचायतीच्या सदस्या योगिता कोलते यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com