Holiday announced for Pune Schools : पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा!

Heavy Rain warning in Pune District : जिल्ह्यातील बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहेत.
Pune Collector Suhas Diwase
Pune Collector Suhas Diwase Sarkarnama

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी सध्या अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने तर मुंबईसह उपनगर भागात रेड अलर्टही जाहीर केला आहे. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. जनविस्कळीत झाले असून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाळांनाही मंगळवारी सुट्टी जाहीर केली गेली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यात 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानेपुणे जिल्ह्यातील बारवी पर्यंतच्या सर्व शाळांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहेत.

Pune Collector Suhas Diwase
Mumbai Rain : महाभ्रष्ट युतीने 'चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया'! काँग्रेसने सरकारची पिसं काढली

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Pune Collector Suhas Diwase
PCMC News : ...म्हणून महापालिका आयुक्त सिंह यांची बदली करा; भाजप नेत्यांची फडणवीसांकडे मागणी

याशिवाय, नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com