Shekhar Singh and PCMC
Shekhar Singh and PCMC Sarkarnama

PCMC News : ...म्हणून महापालिका आयुक्त सिंह यांची बदली करा; भाजप नेत्यांची फडणवीसांकडे मागणी

BJP Political Leader Demand To Devendra Fadnavis : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त आणि प्रशासक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून शेखर सिंह यांच्या बद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Published on

Pimpri News : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह हे मनमानी कारभार करत आहेत. त्यांचा प्रशासनावर वचक नसल्याने महापालिकेत अनागोंदी कारभार सुरू असून यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यांच्या या कारभारामुळे राज्य सरकारची प्रतिमा नागरिकांच्या मनात खराब होत चालली आहे.

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराच्या विकासासाठी नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक यांची मदत घेऊन त्यांना विश्वासात घेणे आवश्यक असते. मात्र, महापालिका आयुक्त शेखर सिंह एककल्ली कारभार करत आल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तांच्या चुकीच्या कारभारामुळे राज्य सरकारची प्रतिमा जनमाणसात खराब होत आहे. त्यामुळे आयुक्तांना हटवून सक्षम अधिकारी आयुक्तपदी नेमावा अशी मागणी भाजपचे अमोल थोरात यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन थोरात यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त आणि प्रशासक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून शेखर सिंह यांच्या बद्दल भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या नेत्यांकडे शेखर सिंह यांच्याबाबत तक्रारी करून त्यांची बदली करण्याची मागणी केली आहे. महापालिकेत प्रशासक म्हणून काम करणारे शेखर सिंह हे ठराविक पदाधिकाऱ्यांनाच मनाचे स्थान देत असल्याचा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

महानगरपालिकेत 2022 पासून प्रशासकराज सुरू झाले. नगरसेवकांची मुदत संपल्याने राज्य सरकारने प्रशासकाच्या हाती महापालिकेचा संपूर्ण कारभार दिला. प्रशासक म्हणून सिंह त्यांनी पारदर्शी, उत्तम कामगिरी बजावणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत ते आपला मनमानी पद्धतीने काम करत असल्याचे फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आयुक्तांनी शहरातील मोठ्या बांधकाम व्यवसायिकांना रस्ते खोदाई प्रकरणात पाठीशी घालत पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे.

Shekhar Singh and PCMC
Dhairyasheel Mohite Patil : 'त्यांचा' जनतेनेच करेक्ट कार्यक्रम केला; मोहिते पाटलांनी दिले शेखर गोरेंना क्रेडीट...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कामकाजाचे वचन देत सत्ता मिळवली होती. भाजपकडून शहरवासीयांना अपेक्षा आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी भाजपवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. मात्र पालिका आयुक्त शेखर सिंह यांची कार्यशैली संशयास्पद आहे. शहरातून पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना पालिका आयुक्त सिंह हे प्रदीर्घ रजेवर गेले. पालखी सोहळ्याबाबत ते उदासीन असल्याचे दिसून आले.

आयुक्त शेखर सिंह यांचा मनमानी कारभार असा सुरू राहिल्यास याचा फटका पुढील दोन-तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि पर्यायाने महायुतीला बसू शकतो. आयुक्तांच्या कारभारामुळे आयते मुद्दे निवडणुकीच्या काळात विरोधकांच्या हाती लागून त्यामुळे भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना पदावरून हटवून त्यांच्याजागी आयुक्त म्हणून सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Shekhar Singh and PCMC
Vidhan Parishad Election: ठाकरे गट, भाजप अलर्ट, फोडाफोड टाळण्यासाठी उचललं मोठं पाऊल; आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com