Lok Sabha Election Expenditure : बारामतीत होऊ दे खर्च; पुणे जिल्ह्यात एकाही उमेदवाराने केला नाही कोटीचा टप्पा पार!

Lok Sabha Election 2024 Expenditure by Maharashtra Politicians : निवडणुकीत सर्वाधिक खर्च 93 लाख 89 हजार 799 रुपये हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केला आहे.
Lok Sabha Election Expenditure
Lok Sabha Election Expenditure Sarkarnama

Pune News : गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे दिसून येते. मात्र, लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी खर्च केलेले अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे.

विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील एकाही उमेदवाराने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला नाही. सर्वाधिक खर्च बारामतीमधील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केला तर सर्वात कमी खर्च पुणे मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यातील एकाही उमेदवाराकडून 95 लाख रुपयांच्या खर्च मर्यादेचे उल्लंघन केले नसल्याचा समोर आला आहे. निवडणुकीत सर्वाधिक खर्च 93 लाख 89 हजार 799 रुपये हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केला आहे. तर पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सर्वात कमी 68 लाख 30 हजार 322 रुपये खर्च केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे Supriya Sule यांचा खर्च 87 लाख 96 हजार 904 रुपये झाला आहे. यानंतर मावळ मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 82 लाख 7 हजार 192 रुपये खर्च केला आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी 74 लाख 75 हजार 357 रुपये खर्च केला आहे.

निवडणुकीतील अधिकृत खर्चाचा तपशील लोकसभा निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना मतमोजणी झाल्यानंतर 30 दिवसांनी जाहीर करणे बंधनकारक असते. उमेदवाराकडून सादर करण्यात आलेला खर्चाचा तपशील जिल्हास्तरीय समिती तपासणी करून तो अंतिम करते.

Lok Sabha Election Expenditure
Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपती विधीमंडळात आज आमदारांसमोर काय बोलणार?

मंत्री मोहोळ यांचा खर्च किती?

पुण्यातील भाजप महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीत 81 लाख 39 हजार 481 रुपये खर्च केले असून त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 68 लाख 30 हजार 322 रुपये खर्च केला आहे.

कोल्हेंचा खर्च 70 लाख

शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा खर्च 70 लाख 42 हजार 730 रुपये, तर अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 86 लाख 64 हजार 653 रुपये खर्च केला आहे.

Lok Sabha Election Expenditure
Land Scam : काँग्रेसच्या आणखी एका मुख्यमंत्र्याला जमीन घोटाळा भोवणार; सिद्धरामय्या, पत्नी पार्वती यांच्यासह 10 जणांवर गुन्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com