Land Scam : काँग्रेसच्या आणखी एका मुख्यमंत्र्याला जमीन घोटाळा भोवणार; सिद्धरामय्या, पत्नी पार्वती यांच्यासह 10 जणांवर गुन्हा

Karnataka Chief Minister Siddaramaiah : बनावट कागदपत्रे सादर करून म्हैसूर शहर विकास प्राधिकारणामध्ये (मुडा) भूखंड बळकावल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आहे.
 Siddaramaiah
SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Bangalore, 11 July : कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) अडचणीत आले सापडले असून त्यांच्यासह पत्नी आणि दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रे सादर करून म्हैसूर शहर विकास प्राधिकारणामध्ये (मुडा) भूखंड बळकावल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या अडचणीत आले आहेत.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah), पत्नी पार्वती, आई मल्लिकार्जुनस्वामी देवराज आणि कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार देण्यात आली होती. जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपनिबंधक आणि मुडा अधिकाऱ्यांचाही या घोट्याळ्यात सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे. आता थेट कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने कर्नाटकात खळबळ उडाली आहे.

बनावट कागदपत्रे तयार करून ‘मुडा’ची फसवणूक करण्यात आली आहे, अशी तक्रार म्हैसूरच्या विजयनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्या तक्रारीनुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती आणि एकूण १० जणांच्या विरोधात भूखंड बळकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

म्हैसूर शहर विकास प्राधिकारणामधील भूखंड घोट्याळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते स्नेहमाई कृष्णा यांनी राज्यपाल, कर्नाटकचे मुख्य सचिव, महसूलचे प्रधान सचिव यांना पत्र लिहून तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीमध्ये कृष्णा यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. प्राधिकरणातील भूसंपादनातील ‘स्टेट डीड’बाबत शंका घेण्यात आलेली आहे.

या जमिनीचे मूळ मालकाच्या पुत्रावर म्हणजे मल्लिकार्जुनस्वामी देवराज यांच्या अस्तित्वावरच सवाल करण्यात उपस्थित करण्यात आलेले आहेत. जमिनीचे संपादन1998 मध्ये सोडण्यात आले आहे. हे खरे असेल तर मग ‘आरटीसी’मध्ये 2010 पर्यंतच्या भूसंपादनाचा उल्लेख का आहे. तसेच, संबंधित भूखंड मल्लिकार्जुनस्वामी देवराजू यांच्या मालकीचा होता आणि तो त्यांच्याच ताब्यात होता, तर देवराजू यांनी प्राधिकरणाकडून करण्यात येत आलेली विकास कामे का थांबवली नाहीत? असा सवाल स्नेहमाई कृष्णा यांनी केले आहेत.

या घोटाळ्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपनिबंधक आणि मुडा अधिकारी यांचाही सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे, त्यामुळे या घोटाळ्यात आणखी कोण कोण बडे मासे गळाला लागतात, हे पाहावे लागेल.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणाले ?

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, आमच्या जमिनीवर मुडाने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेले आहे. आम्ही आमच्या जमिनीचा मोबदला मुडाकडे मागितला, त्यावेळी त्यांनी आम्हाला म्हैसूर विजयनगर जमीन दिली आहे, असे मुडाने एका बैठकीत मान्य केलेले आहे. विजयनगरमध्ये आम्हाला जागा द्या. असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही. भारतीय जनता पक्षा यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com