Dattatray Bharane-Ajit Pawar
Dattatray Bharane-Ajit PawarSarkarnama

Dattatray Bharane : दादा, माझ्या रस्त्यात काचा-काटे टाकले जाताहेत, जाणूनबुजून मला त्रास दिला जातोय; भरणेंनी केलं मन मोकळं

NCP Jan Sanman Yatra : एवढा निधी आणला... एवढं काम केलं... एवढं कष्ट केलं. रात्रंदिवस मरतोय...झटतोय....कष्ट करतोय....प्रमाणिकपणे प्रयत्न करतोय. कधी कुटुंबाला वेळ दिलेला नाही. पण, कायम इंदापूर तालुक्याच्या विकासाचाच विचार केला आहे.
Published on

Indapur, 23 August : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत इंदापूर तालुक्यात पाच हजार कोटींचा निधी आणला आहे. एवढं काम केल्यानंतर चांगलं दिवस येतील असं वाटलं होतं. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यात काटे-काचा टाकल्या जात आहेत.

इंदापूर तालुक्यात असे अनेक विरोधक आहेत, ते आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी राजकीय व्यथा मांडत इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे यांंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढे आपले मन मोकळे केले.

इंदापूर शहरात आयोजित जनसन्मान यात्रेत (Jan Sanman Yatra) बोलताना आमदार भरणे यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली. ते म्हणाले, पूर्वीचा इंदापूर तालुका आणि आजचा तालुका काय आहे, याचा नीट विचार करा. इंदापूर तालुक्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत पाच हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अरे पाच हजार कोटींचा निधी कशाला म्हणतात, याचा जरा विचार करा.

एवढा निधी आणला... एवढं काम केलं... एवढं कष्ट केलं. रात्रंदिवस मरतोय...झटतोय....कष्ट करतोय....प्रमाणिकपणे प्रयत्न करतोय. कधी कुटुंबाला वेळ दिलेला नाही. पण, कायम इंदापूर तालुक्याच्या विकासाचाच विचार केला आहे. एवढं काम करूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यामध्ये, उठताना बसताना, झोपताना काटे टाकले जात आहेत. काचा टाकल्या जात आहेत.

मुद्दामहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो. त्या वेळी माझी भावना काय होत असेल. रात्री झोपताना किती त्रास होत असेल हे माझं मी भोगतोय रे बाबांनो, असे वक्तव्य दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी केले आहे.

Dattatray Bharane-Ajit Pawar
Maharashtra Band : शरद पवारांच्या बंद मागे घेण्याच्या आवाहनावर काँग्रेसची प्रतिक्रिया; चेन्निथला म्हणाले...

एवढं काम केल्यानंतर लोकांना वाटतं की, मला आता कुठं बरे दिवस येतील. आता कुठं बरं होईल. पण, इंदापूर तालुक्यात अनेक असे विरोधक आहेत, ते आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी व्यथा भरणे यांनी मांंडली.

भरणे म्हणाले, मी काम करणारा माणूस आहे. बोलताना कुठं चुकलं असेल. कुणावर बोललो असेल, रागावलो असेल त्यात माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. इंदापूर तालुक्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी जेवढं काही करता येईल, तेवढं करण्याचा प्रयत्न मी प्रामणिकपणे करत आहे.

Dattatray Bharane-Ajit Pawar
Sharad Pawar Politic's : कागलच्या गैबी चौकात शरद पवार करणार एकेकाळच्या पट्टशिष्याचा हिशेब!

आम्हाला विकास निधी देऊ नका. आम्हाला शेतीचे हक्काचं पाणी मिळावं. बावीस गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. प्रलंबित पाणी प्रश्न सोडवले तर इंदापूरला शे दोनशे वर्षे पाणी कमी पडणार नाही, असेही भरणे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com