Sharad Pawar Politic's : कागलच्या गैबी चौकात शरद पवार करणार एकेकाळच्या पट्टशिष्याचा हिशेब!

Hasan Mushrif Vs SamarjeetShinh Ghatge : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुश्रीफ यांनी उचल खालली आणि अजित पवार यांच्यासोबत भाजपच्या वळचणीला गेले. खरे तर सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर कोल्हापूरमध्ये शरद पवारांचे मुश्रीफ हेच अत्यंत निकटवर्तीय होते.
Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge
Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 23 August : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महायुतीकडे गेलेले हसन मुश्रीफ यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी पारंपारिक विरोधक समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला अखेर जय श्रीराम करत हाती तुतारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे येत्या 3 सप्टेंबर रोजी कागल दौऱ्यावर येणार आहेत. याचवेळी समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. पवार हे कागलच्या गैबी चौकात जाहीर सभा घेत एकेकाळचे पट्टशिष्य असलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा हिशेब करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र बंद बाबतची माहिती देण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कागलच्या दौऱ्यावर मी बहुतेक 3 सप्टेंबर रोजी जाणार आहे. कागलमधील गैबी चौकात एक जाहीर सभा घ्यावी, असा कागलकरांचा (Kagal) प्रचंड आग्रह आहे. त्या आग्रहाला मी प्रतिसाद द्यायचं ठरवलं आहे, अशा शब्दांत पवारांनी कागलमधील सभेची माहिती दिली आहे.

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील 40 ते 42 आमदारांनी युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यात कागलचे हसन मुश्रीफ यांचाही समावेश होता. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे कागलमधून तब्बल पाच वेळा निवडून आले आहेत. शरद पवारांचे एकनिष्ठ शिलेदार अशी मुश्रीफांची ओळख होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात मंत्री असलेले मुश्रीफांच्या घरावर ईडीचे अनेकदा छापे पडले. मात्र, मुश्रीफ डगमगले नव्हते, त्यामुळे त्यांची पवारांवरील निष्ठा दिसून येते.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मात्र त्यांनी उचल खालली आणि अजित पवार यांच्यासोबत भाजपच्या वळचणीला गेले. खरे तर सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर कोल्हापूरमध्ये शरद पवारांचे मुश्रीफ हेच अत्यंत निकटवर्तीय होते.

Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge
CM Ladki Bahin Yojana : सर्वसामान्य महिलांच्या खात्यांवर जाणारे पैसे प्रणिती शिंदेंना खुपत आहेत; राम सातपुतेंचा पलटवार

सदाशिवराव मंडलिक यांचे शिष्य म्हणून मुश्रीफ यांची कागलच्या राजकारणात ओळख होती. मात्र, पवारांनी 2009 मध्ये कोल्हापूरमधून संभाजीराजे छत्रपती यांना तिकिट देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मुश्रीफांनी आपल्या गुरुची साथ सोडून संभाजीराजे यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. त्यामुळे पवारांशी त्यांचे नाते हे विशेष असे होते.

एकेकाळचे पट्टशिष्य असलेले मुश्रीफ हे आता पवारांच्या रडारवर आले आहेत. कारण, ऐन मोक्याच्या वेळी साथ सोडणाऱ्यांना धडा शिकवण्याचे पवारांनी मनावर घेतलेले दिसते. काहींचा हिशेब त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केला आहे, तर काही जणांचा विधानसभा निवडणुकीत हिशेब होणार आहे, त्यातील आघाडीवरचे नाव हे हसन मुश्रीफ यांचे आहे.

हसन मुश्रीफ यांना धडा शिकवण्यासाठी पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समरजितसिंह घाटगे यांनाच गळाला लावले आहे. घाटगे यांनीही भाजपच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. समरजितसिंह घाटगे यांच्या माध्यमातून मुश्रीफांसारख्या पहिलवानाला कागलच्या मैदानात लोळवण्याची तयारी चालवली आहे.

Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge
Samarjitsinh Ghatge News : '231 मतांचा पराभव आजही खदखदतोय, तो झाला नव्हता केला होता'; घाटगेंच्या समोर थेटच सांगितले

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज समरजितसिंह यांची भेट घेऊन पूर्वतयारी केली आहे. आता शरद पवार हे येत्या 3 सप्टेंबरला कागलमध्ये येणार आहेत. कागलच्या गैबी चौकात पवारांची जाहीर सभा होणार आहे, त्याच दिवशी कदाचित घाटगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकतो. कागलच्या गैबी चौकातूनच पवार हे आता आपल्या पट्टशिष्याचा हिशेब करण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com