Indapur Politics : मी निवडणुकीपुरता मामा नाही; भरणेंनी साधला हर्षवर्धन पाटलांवर निशाणा

Harshvardhan Patil Vs Dattatray Bharane : इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे आमदार आहेत, तर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आहेत. मागची निवडणूक दोघांनी एकमेकांविरोधात लढवली आहे. आताही पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.
Harshvardhan Patil - Dattatray Bharane
Harshvardhan Patil - Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

Indapur, 06 September : महायुतीमध्ये जागा वाटपावरून आतापासून धूसफूस पाहायला मिळत आहे. विशेषतः राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये त्यावरून जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे आमदार आहेत, तर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आहेत. मागची निवडणूक दोघांनी एकमेकांविरोधात लढवली आहे.

आताही हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. मात्र, आपण निवडणुकीपुरता मामा नाही, असे म्हणत भरणेंनी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

इंदापूर (Indapur) तालुक्यातील भादलवाडी तलावातील पाण्याचे पूजन आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना उद्देशून भरणे यांनी ‘तुम्हीच सगळे मामा आहेत; म्हणून पाव्हणा रावळा जेवढं काही करता येईल, तेवढा प्रयत्न करा’ असं आवाहन केलं.

आपण कधीही जवळचा लांबचा, गट तट पाहिले नाही. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत केली आहे. आता काही जण येथील त्यांना जेवू घाला, वरून ताक प्यायला द्या म्हणजे ढेकर देऊन जातील, असा सल्ला त्यांनी मतदारांना दिला.

मी निवडणुकीपुरता मामा नाही. निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी तुमच्यासोबत आहे. निवडणुकीपुरतं यायचं, गोड बोलायचं आणि पावणेपाच वर्षे गायब व्हायचं, असा मी नाही, अशा शब्दांत दत्तात्रेय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.

दरम्यान, महायुतीचं जागावाटप अद्याप झालेलं नाही. मात्र, इंदापूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पुन्हा एकदा इंदापूरमधून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनीही इंदापूरमधून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यासाठी ते भाजपतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मध्यंतरी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सलग दोनदा भेट घेतली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार का, अशी चर्चा रंगली होती. विद्यमान आमदार असल्यामुळे दत्तात्रेय भरणे यांना महायुतीकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com