तुम्हाला देण्यासारखे माझ्याकडे काही नाही; पण मला तुमची ताकद हवीय !

शिवसेनेच्या (Shivsena Pune) पुण्यातील पदाधिकारी व माजी नगरसेवकांची बैठक आज मुंबईत झाली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

पुणे : आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही परंतु मला तुमची ताकद मला हवी आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपाचा (Bhartiya Janata Party) शिवसेनेला (Shivsena) संपवण्याचा डाव आहे, असा पुनरुच्चार शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईत केला.

Uddhav Thackeray
चाकणकर `पाॅलिटिकल मॅच्युरिटी` दाखविणार? : रहाटकरांचा तेव्हाचा राजीनामा चर्चेत

शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकारी व माजी नगरसेवकांची बैठक आज मुंबईत झाली. यावेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली. या वेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांवर टीका केली. यापुढच्या काळात आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून शिवसेनेला पुन्हा एकदा बलवान बनवायचे असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
केसरकर तब्बल महिन्याभरानंतर मतदारसंघात परतणार; शिवसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘‘ राज्य सरकारमध्ये हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवावी. सध्याच्या सुरू असलेल्या घडामोडींवरून राज्यात कशापद्धतीने घटनेची पायमल्ली होत आहे, हे सारा देश पाहतोय.एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातोय. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणात असून अरुणाचल प्रदेशप्रमाणे लागण्याची शक्यता आहे.’’

यावेळी शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बोलताना भाऊक झाल्या. त्या म्हणाल्या, ‘‘ यापुढच्या काळात आपण एकजुटीने व ताकतीने काम करायचे आहे.या कठीण काळात आपले नेते उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com